“साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा..!”
या उक्तीप्रमाणे साडेतीन मूहर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विजयादशमी निमित्ताने वडगाव शहरातील शिवभक्तांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीचा शिवकाळ जागवत सिमोल्लघन केले. ( Celebrating Dussehra Festival 2022 In Traditional Attire In Vadgaon Maval City )
शिवभक्तांनी शिवकालीन पारंपरिक वेशभूषेत ( Traditional Attire ) दसऱ्याच्या पूर्वसंध्येला गावात फेरफटका मारत लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांना विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शहरातील तरुणांमधील नकारात्मक प्रवृत्तीचे दहन करून सर्वत्र सकारात्मकतेचे चैतन्य निर्माण करण्यासाठी तसेच अज्ञानावर ज्ञानाने, असत्याने सत्यावर, वैऱ्यावर प्रेमाने आणि शत्रुवर पराक्रम गाजवित विजय प्राप्त करण्याचा हा दिवस असल्याने ग्रामीण भागात प्रबोधन करण्याच्या अनुषंगाने हा अनोखा बेत तयार केला, असे सांगितले.
हेही वाचा – आमदार शेळके आणि नगराध्यक्ष ढोरे यांच्या माध्यमातून वडगावमधील केशवनगर भागातील रस्ता आणि ड्रेनेजचे काम मार्गी
अनोख्या उपक्रमात वडगाव शहरातील शिवभक्त सचिन ढोरे, गणेश जाधव, रविंद्र विनोदे, नितीन चव्हाण, किरण चिमटे, तुषार वहिले, खंडेराव जाधव, चिराग वाघवले आदींनी सहभाग घेतला होता.
विजयादशमी हा दिवस अतिशय शुभ समजला जातो. त्यामुळे शिवकालीन पारंपरिक पद्धतीने नटलेल्या या हुरहुन्नरी तरुणांचे वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले. यावेळी मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी त्यांचे औक्षण करत विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
( माहिती स्त्रोत – फेसबुक : मोरया महिला प्रतिष्ठान वडगाव-मावळ)
अधिक वाचा –
खंडाळ्यात बेस्ट डान्स, ड्रेस स्पर्धा संपन्न; मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण I Navratri 2022
विजयादशमी निमित्त तळेगाव दाभाडे इथे शेकडो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत पथसंचलन संपन्न I RSS Talegaon Dabhade