सालाबाद प्रमाणे यंदाही नवरात्री निमित्त लोणावळा ( Lonavla ) शहराजवळील खंडाळा ( Khandala ) येथे नवरात्री उत्सव ( Navratri 2022 ) केलपेथ खंडाळा यांच्याकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शौकत भाई शेख मित्र परिवार ( भाजपा अध्यक्ष, मावळ अल्पसंख्य ) यांच्याकडून दर वर्षी बेस्ट डान्स, बेस्ट ड्रेस, संगीत खुर्ची स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत. यावेळी आलेल्या सर्व महिलांना साडी वाटप करण्यात आले तर स्पर्धक मुलामुलींना बक्षीसे देण्यात आली.
लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष पुजारी साहेब, भाजप संघटक भगवान सेठ या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण पार पडले. तर यावेळी खंडाळा मुस्लिम जमात ट्रस्ट नूर भाई शेख, साई नाथ मित्र मंडळ अध्यक्ष स्वप्नील सपकाळ, भाजप मावळ तालुका चित्रपट अध्यक्ष सागर सेठ बेलुरे, भाजप खंडाळा अल्पसंख्य अध्यक्ष साजिद भाई बेपारी आदी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. ( Navratri 2022 Khandala Lonavala Organizing competitions Distribution of Prizes )
अधिक वाचा –
विजयादशमी निमित्त तळेगाव दाभाडे इथे शेकडो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत पथसंचलन संपन्न I RSS Talegaon Dabhade
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा महानवमी होम संपन्न