एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी केलेल्या बंडानंतर मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) शिवसेनेतही ( Shiv Sena ) मोठी फूट पडल्याचे दिसून आले. स्वतः मावळ तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख ( Shiv Sena Maval Taluka Chie ) असलेले राजेश खांडभोर ( Rajesh Khandbhor ) हेच शिंदे गोटात गेले होते. त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनीही एकनाथ शिंदे गटात जाण्यात धन्यता मानली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांत वडगाव ( Vadgaon ) येथे उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांनी भव्य मेळावा घेऊन तालुक्यातील शिवसैनिकांची ताकद दाखवून दिली होती. यात शिवसेनेचे अनेक आजी-माजी पदाधिकाकरी होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तेव्हापासूनच शिवसेना मावळ ( Shiv Sena Maval ) तालुकाप्रमुख पदी नवी नियुक्ती उद्धव ठाकरेंकडून केली जाईल, अशी सर्वांना अटकळ होती. अखेर विजयादशमीच्या दिवशीच मावळ तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना गुडन्यूज मिळाली. लोणावळा विभागातील शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक आशिष ठोंबरे ( Ashish Thombre ) यांची शिवसेना मावळ तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सुरेश गायकवाड यांची उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना भवनातून तसे पत्रक काढण्यात आले असून सामनातून या वृत्तला प्रसिद्धी देण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर यांनी स्वतः आशिष ठोंबरे यांना फोन करुन त्यांच्या नव्या जबाबदारी आणि नियुक्तीची कल्पना देत अभिनंदन केले. ( Shiv Sena Appointed Ashish Thombre As Maval Taluka Chief )
अधिक वाचा –
Photo : व्वाह.. सुंदर! वडगाव शहरात पारंपारिक शिवकालीन वेशभूषेत विजयादशमी साजरी I फोटो व्हायरल
खंडाळ्यात बेस्ट डान्स, ड्रेस स्पर्धा संपन्न; मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण I Navratri 2022