व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आख्ख्या महाराष्ट्राला ठाकरे-शिंदेंची चिंता, पण इकडे तर ठाकरे-शिंदे घरी लगीनघाई सुरु, विश्वास नसेल तर लग्नपत्रिका पाहा

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे, दसरा मेळाव्याची राजकीय फटकेबाजी आणि शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 6, 2022
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे
Thackeray-Shinde-Marriage

Photo : Aaditya Gund


सध्या महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध शिंदे म्हणजेच उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष उभा ठाकलेला दिसतोय. दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील भेटतील तिथे एकमेकांवर डोळे ताणतायेत, त्यात बुधवारी (5 ऑक्टोबर) रोजी झालेले दसरा मेळावे म्हणजे तर या संघर्षाचा लाईव्ह टेलिकास्ट होता. त्यामुळे सर्व महाराष्ट्राला सध्या शिंदे आणि ठाकरे यांचे कसे होणार याची चिंता लागलीये. मात्र, अशात दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे या दोन घराण्यांची दिलजमाई झाल्याचेही दिसून आले असून सध्या याबाबत एक लग्नपत्रिका सोशलवर व्हायरल होत आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे, दसरा मेळाव्याची राजकीय फटकेबाजी आणि शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळत आहे. मात्र या सर्व धामधुमीत जुन्नर तालुक्यातील एका लग्नपत्रिकेने साऱ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

Wedding-Card
Photo : Wedding Card

जुन्नर तालुक्यातील वडगावसहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक श्री खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या चि. सौ.कां. अनुराधा यांचा शुभविवाह दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशलवर व्हायरल झाली असून पुणे जिल्ह्यात शिंदे आणि ठाकरे घरांच्या या नव्या नातेसंबंधामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये या विषयाची जोरदार चर्चा होत आहे.

हेही वाचा – शिवसेना भवनातून नवा आदेश..! शिवसेना मावळ तालुका प्रमुख पदी ‘यांची’ नियुक्ती, तर उपजिल्हाप्रमुख पदीही नवा चेहरा

तसेच सध्याच्या राजकीय तणावाच्या वातावरणात ही लग्नपत्रिका पाहून चेहर्‍यावर आनंद, हसू पहायला मिळत असून चांगलीच करमणूक होत आहे, एवढं मात्र नक्की ! ( Pune Thackeray Shinde Marriage Wedding card Viral on social )

अधिक वाचा –

Photo : व्वाह.. सुंदर! वडगाव शहरात पारंपारिक शिवकालीन वेशभूषेत विजयादशमी साजरी I फोटो व्हायरल
विजयादशमी निमित्त तळेगाव दाभाडे इथे शेकडो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत पथसंचलन संपन्न I RSS Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

शिवसेना भवनातून नवा आदेश..! शिवसेना मावळ तालुका प्रमुख पदी ‘यांची’ नियुक्ती, तर उपजिल्हाप्रमुख पदीही नवा चेहरा

Next Post

ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या 7 हजार 649 ग्रामपंचायतींसाठी ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेला प्रारूप मतदार याद्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Draft-Voter-Lists

ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या 7 हजार 649 ग्रामपंचायतींसाठी ऑक्टोबरच्या 'या' तारखेला प्रारूप मतदार याद्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.