तत्कालीन ग्रुप ग्रामपंचायत शिळींब चे ( Shilimb Village ) माजी सरपंच ( Former Sarpanch ) आबुराव बाबूराव लायगुडे ( Aaburao Baburao Laygude ) यांचे आज शुक्रवार ( 14 ऑक्टोबर ) रोजी दुःखद निधन झाले. आबुराव लायगुडे यांचे वयाच्या 83 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या शनिवार, दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता, वैकुंठ स्मशानभूमी, नवीपेठ, पुणे येथे होणार आहे. ( Aaburao Baburao Laygude Passed Away Due to Short Illness )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आबुराव लायगुडे हे मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. तसेच प्रगतशील शेतकरी म्हणून ते पंचक्रोशीत परिचित होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे त्यांची पत्नी कलाबाई बाबुराव लायगुडे यांसह त्यांचे तीन पुत्र आत्माराम आबुराव लायगुडे, शिवाजी आबुराव लायगुडे, रविंद्र आबुराव लायगुडे आणि नातवंडे असा परिवार आहे. तसेच, त्यांच्या स्नुषा रूपाली रविंद्र लायगुडे या आजिवली गावच्या पोलिस पाटील आहेत. आबुराव लायगुडे यांची मुले ही प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक असून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन समाजकार्य करण्यात अग्रेसर आहेत. आबुराव लायगुडे यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक जुणा जाणता शिलेदार हरपला असल्याची भावना संतोष कडू यांनी व्यक्त केली. ( Shilimb Village Former Sarpanch Aaburao Baburao Laygude Passed Away Due to Short Illness )
अधिक वाचा –
पवनमावळमधील अनेक गावांत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भात पिक प्रकल्प अंतर्गत शास्त्रज्ञ भेट
Video : निसर्ग सौंदर्याचा अद्भूत नजारा, घोराडेश्वर डोंगरावर पसरलीये फुलांची भगवी चादर