मावळ तालुक्यातील रिक्त असलेल्या 47 गावांतील पोलिस पाटील पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. यात वडगावसह तळेगाव दाभाडे, खडकाळा, कुसगाव बुद्रूक, नवलाख उंब्रे आदी मोठ्या गावांची पदे आरक्षित झाली आहेत. तसेच केवळ सात गावांची पदे सर्वसाधारण वर्गासाठी तर तीन गावांची पदे सर्वसाधारण महिलांसाठी खुली राहिली आहेत.
मावळ तालुक्यातील 47 गावांच्या रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांसाठी बुधवारी (दिनांक 27 ऑगस्ट) बावधन येथील प्रांत कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख उपस्थित होते. ( Reservation of Police Patil posts in 47 villages of Maval taluka announced See list )
मावळ तालुक्यातील 47 पैकी अनुसूचित जातीसाठी 3, अनुसूचित जाती महिलांसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 4, अनुसूचित जमाती महिलांसाठी 3, विशेष मागास प्रवर्गासाठी 2, विमुक्त जाती(अ) साठी 1, विमुक्त जाती (अ) महिलांसाठी 1, भटक्या जमाती (ब) साठी 3, भटक्या जमाती (क) साठी 3, भटक्या जमाती(ड) साठी 3, भटक्या जमाती (ड) महिलांसाठी 1, इतर मागास प्रवर्गासाठी 1, इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी 4, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक महिलांसाठी 2, सर्वसाधारण साठी 7 आणि सर्वसाधारण महिलांसाठी 3 गावांची पदे आरक्षित झाली आहे.
हेही वाचा – दैनिक मावळ विशेष – कर्णवेध संस्कार । कान का टोचले जातात? भिकबाळी का वापरावी? कर्णभुषणे महत्व व परंपरा, वाचा…
जाहीर झालेली आरक्षण सोडत खालील प्रमाणे;
अनुसूचित जाती – चांदखेड, वडगाव मावळ, शिलाटणे
अनुसूचित जाती महिला – खडकाळा, सोमाटणे, कुसगाव बुद्रूक, तळेगाव दाभाडे, भुशी
अनुसूचित जमाती – तुंगार्ली, वडेश्वर, नवलाख उंब्रे, दुधिवरे
अनुसूचित जमाती महिला – वलवण, कोळे चाफेसर, कुणे नामा
विशेष मागास प्रवर्ग – कडधे, मंगरूळ
विमुक्त जाती (अ) – मालेवाडी
विमुक्त जाती (अ) महिला – डोणे
भटक्या जमाती (ब) – कुसगाव खुर्द, खामशेत, पानसोली
भटक्या जमाती (क) – आपटी, आतवण, तुंग
भटक्या जमाती (ड) – जांबवडे, करुंज, शिरे
भटक्या जमाती (ड) महिला – बेडसे
इतर मागास प्रवर्ग – दारुंब्रे
इतर मागास प्रवर्ग महिला – कुसगाव प.मा., कातवी, आंबी, पाचाणे
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ई.डब्ल्यू.एस.) – माजगाव
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ई.डब्ल्यू.एस.) महिला – बोरवली, आंबेगाव
सर्वसाधारण – सदापूर, बोरज, येळसे, महागाव, गेव्हंडे आपटी, भडवली, घोणशेत
सर्वसाधारण महिला – ब्राम्हणवाडी (बऊर), राकसवाडी, वेल्हवळी
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित, वाचा काय आहेत निर्बंध
– चांगला निर्णय! आदिवासींच्या खेळांना क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळणार
– जुना मुंबई पुणे हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल