मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी अंतरवली (जालना) इथे सुरु असलेल्या आंदोलनातील मराठा आंदोलक बांधवांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. तसेच हवेत गोळीबार, पोलिसी बळाचा गैरवापर आदी घडामोडी घडल्या होत्या. मागील आठवड्यात घडलेल्या या घटनेनंतर राज्यभरातील मराठा बांधवांनी निषेध व्यक्त केला, तसेच अनेक ठिकाणी मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते. ( Lathi charge case on Jalna Maratha protesters big decision of maharashtra government )
आज (सोमवार, दिनांक 4 सप्टेंबर) राज्यातील अनेक भागात कडतडीत बंद देखील पाळण्यात आला. ह्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. “जालना इथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. अपर पोलीस अधिक्षक व उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत.” अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
“सदर संपूर्ण प्रकरणाची चौकशी अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत करण्यात येईल, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय होईल” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
#LIVE | मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची विशेष पत्रकार परिषद…https://t.co/oYLlMAULMT
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 4, 2023
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– गोरक्षणात प्राण गमावलेल्या गोरक्षकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 लाख; औंध इथे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयाचे उद्घाटन
– मराठा समाजाचा निर्णय घेता येत नसेल तर सत्तेत तरी कशाला बसता?
– ‘पवना धरणातील पाणी पाहिजे पण पवना नदी नको, असं का?’, पवनमावळची जीवनदायिनी पुढे बनतेय मैलावाहिनी