पवनानगर : शिक्षक दिनाचे (5 सप्टेंबर) औचित्य साधून व्हील्स इंडीया लिमीटड, रांजणगाव MIDC यांच्या विशेष फंडातून पवन मावळातील ग्रामीण व दुर्गम भागातील सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबविण्याकरिता मोफत सायकल वाटप समारंभ संपन्न झाला. यावेळी पवना विद्या मंदिर व वारु कोथुर्णे माध्यमिक विद्यालय कोथुर्णे शाळेतील 20 मुलींना सायकली देण्यात आल्या. ( distribution of bicycles to schools in pavan maval by Wheels India Company )
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोषजी खांडगे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, गणेश धानिवले, प्रमुख पाहुणे म्हणून के.डी. दिसले (Sr. Gm, Manufacturing), भोसले पी. एस. (Asst.Manager -HR), एस डी (Dy. GM-HR), भापकर एस. एन. (Sc.Manager HR. & IR), धनश्री सचिन माघाडे (senior officer HR), मुथा सी.के. (Dr. Manager Account), मनोज शितोळ (सी. एस. आर प्रमुख ),संस्थेचे जेष्ठ संचालक गोपाळे गुरुजी, महेशभाई शहा, सुनिल (नाना) भोंगाडे (पालक सदस्य पवना शिक्षक संकुल), काले गावचे उपसरपंच उत्तम चव्हाण, प्रल्हाद कालेकर (शालेय समिती सदस्य),काशिनाथ निंबळे सर (अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ ), नारायण कालेकर (शालेय समिती सदस्य), कोथुर्णे शाळेतील मुख्याध्यापक संजय ओव्हाळ, माजी पर्यवेक्षिका निला केसकर, जेष्ठ पत्रकार माऊली ठाकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कंपनीचे मॅनेजर दिसले यावेळी बोलताना म्हणाले की, शाळा घरापासून दूर आहे. यामुळे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, ही आमची भावना आहे. त्यामुळेच कंपनीच्या विशेष फंडातून मुलींना आम्ही सायकली वाटत आहोत. यापुढील काळातही मुलींसाठी सायकली देण्यात येतील. यावेळी बोलताना संतोष खांडगे म्हणाले की, मुलींना पुरेशी संधी मिळाली, शिक्षण मिळाले तर, मुलीही उत्तम क्षमतेने कर्तृत्व गाजवू शकतात, हे अनेकदा दिसून आले आहे. मुलीदेखील देदीप्यमान नेतृत्व शकतता महिलांमध्ये क्षमता आहे, फक्त त्यांना संधी मिळायला हवी आणि त्याची सुरुवात शालेय जीवनातूनच व्हायला हवी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर यांनी तर सूत्रसंचालन शाळेच्या जेष्ठ अध्यापिका रोशनी मराडे मॅडम व भारत काळे यांनी केले. तर आभार पर्यवेक्षिका अर्चना शेडगे मॅडम यांनी मानले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शिक्षकदिन, जागतिक शिक्षकदिन आणि गुरुपौर्णिमा – वाचा दैनिक मावळ विशेष लेख
– मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘गावनिहाय संवाद दौरा’, आगामी निवडणूकांची पायाभरणी?
– राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व गावांत साजरी व्हावी; तहसीलदार-गटविकास अधिकारी मावळ यांना निवेदन