वडगाव नगरपंचायतीच्या प्रशासकपदी मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) सुरेंद्र नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वडगाव नगरपंचायतीची नगरसेवकांची मुदत एक महिन्यापूर्वी संपली होती. गेल्या पाच वर्षांत चार मुख्याधिकारी झाले, पण ठोस निर्णय कुणी घेतले नाही. सध्याचे कार्यरत असणारे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम हे शहराच्या विकासासाठी ठोस निर्णय घेऊन विकासकामांना प्राधान्य देत आहेत.
राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी – छापवाले यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी सुरेंद्र नवले यांची नियुक्ती केली आहे. मुख्याधिकारी म्हणून डॉ. प्रवीण निकम हेच असणार आहेत. ( surendra navale was appointed as vadgaon nagar panchayat administrator )
सुरेंद्र नवले चार ठिकाणचे कारभारी
सुरेंद्र नवले यांच्याकडे मावळ, मुळशी विभागाने उपविभागीय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यासोबतच आता तळेगाव दाभाडे नगरपरिषद व वडगाव मावळ नगरपंचायत या दोन्ही ठिकाणी प्रशासक आहेत. त्यामुळे नवले यांना चार ठिकाणचा कारभार पाहावा लागणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगावमध्ये ‘राखी विथ खाकी’ : मोरया प्रतिष्ठानच्या महिला सहकाऱ्यांनी पोलिस बांधवांना बांधली राखी
– वडगावमधील राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश; अशोक मते यांचा खास सन्मान
– वडगाव साखळी रस्त्याच्या कामाबाबत नगरपंचायत प्रशासन ऍक्टिव्ह मोडमध्ये; रस्त्याला अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार