पवन मावळ विभागातील मौजे शिळींब गावात लहान मुलांसाठी वाचनालय सुरु करण्यात आले आहे. डॉ प्रवीण भोळे आणि रुपाली भोळे यांच्या पुढाकारातून शिळींब गावात ‘पालवी’ वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयाचा उद्घाटन कार्यक्रम रविवारी (दिनांक 3 सप्टेंबर) रोजी श्री महादेव मंदिर गावठाण प्रांगणात पार पडला. ( library was started in Shilimb village for children )
ह्या उद्घाटन समारंभावेळी खास लहानग्यांसाठी ‘गोष्टरंग’च्या धमाल नाटुकल्यांचे सादरीकरण करण्यात आले होते. शिळींब गावातील 3 ते 4 वाड्या-वस्तींवरील सुमारे 30 ते 40 लहान बालके मुलं-मुली यावेळी उत्साहाने जमली होती. लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून ‘पालवी’ वाचनालय हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
वाचनाच्या, खेळाच्या, दृकश्राव्य माध्यमाच्या मदतीने मुलांना काही दर्जेदार सकस साहित्य बघायला, ऐकायला मिळावे हा याचा मुळ उद्देश आहे. दर आठवड्यात किमान एकदा पालवी वाचन पेटी आणि मुलं एका ठिकाणी जमतील. एकत्रितपणे काही सुंदर लेख/कविता/कथा वाचन करतील. शहरातील पर्यटकांना गाव खेड्यातील मुलांसोबत जोडण्याचा देखील एक छोटा प्रयत्न आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पवन मावळातील सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठीची पायपीट थांबणार! व्हील्स इंडीया कंपनीची विद्यार्थीनींना मोठी मदत
– ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर कामशेतमधील ‘या’ ई-सुविधा केंद्रात सामान्यांना शासकीय योजनांचे लाभ
– मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘गावनिहाय संवाद दौरा’, आगामी निवडणूकांची पायाभरणी?