राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी 350 रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ बुधवारी (दिनांक 6 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात 3 लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कांदा अनुदानासाठी 10 कोटींपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे.
कांदा अनुदानासाठी दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यातील पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 हजार पर्यत सर्वांना अनुदान जमा होईल. ज्या शेतकऱ्यांची 10 हजार पर्यतची देयक आहेत त्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे. ज्या लाभार्थींचे देयक 10 हजार रुपये पेक्षा जास्त आहे त्या लाभार्थींच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 हजार रुपये अनुदान जमा होणार आहे. ( good news for onion farmers onion subsidy distribution started by maharashtra state government )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– खेळाला साहित्याची जोडी, लहानग्यांना लागणार वाचनाची गोडी! शिळींब गावात ‘पालवी’ वाचनालयाची सुरुवात
– झाडांची भेट आणि वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरे; टाकवेतील 3 युवकांच्या पर्यावरणपुरक सेलिब्रेशनचं सर्वत्र कौतूक
– पवन मावळातील सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठीची पायपीट थांबणार! व्हील्स इंडीया कंपनीची विद्यार्थीनींना मोठी मदत