राज्यातील लाखो-कोटी शिवप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेदरम्यान प्रजेवर अन्याय जुलूम करणाऱ्या आदिलशाही सरदार अफजल खान याचा कोथळा बाहेर काढला होता. महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध करण्यासाठी जे शस्त्र वापरले होते, ते शस्त्र म्हणजे वाघनख. छत्रपती शिवरायांनी तेव्हा वापरलेली वाघनखे जी की ब्रिटीश सरकारच्या संग्रहालयात आहेत असे बोलले जाते, ती आता पुन्हा भारतात आणली जाणार आहेत.
“आपले आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघ नखांनी अफजलखानाचा कोथळा काढला, ती शौर्याचा इतिहास घडविणारी वाघनखे ब्रिटिशांच्या वस्तुसंग्रहालयातून भारतात परत आणली जात आहेत. यासाठी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारचा पाठपुरावा सुरु होता. ब्रिटिश प्रशासनाने वाघनखे भारताला सुपूर्द करण्यास मान्यता दिली आहे. लवकरच ती भारतात येतील. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने हे अतुलनीय यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री जयशंकर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार संबंधीत सर्व मंत्री, अधिकारी यांचे आभार मानतो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय!” अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा प्रदेशाध्यक्ष) यांनी ट्विट करुन दिली आहे. ( chhatrapati shivaji maharaj bagh nakh will be brought back to India from British Museum Shiv Pratap Day Information )
शिवप्रेमींसाठी अतिशय आनंदाचा क्षण.
आपले आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघ नखांनी अफजलखानाचा कोथळा काढला, ती शौर्याचा इतिहास घडविणारी वाघनखे ब्रिटिशांच्या वस्तुसंग्रहालयातून भारतात परत आणली जात आहेत. यासाठी केंद्रातील मोदी सरकार व… pic.twitter.com/uLaqSpjdwQ
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) September 8, 2023
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, पाहा तालुक्यात कुठे किती पाऊस झालाय
– राष्ट्रवादीच्या गाव संवाद दौऱ्याला मावळ तालुक्यात सकारात्मक प्रतिसाद; तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांचा पुढाकार
– ‘गोविंदा रे गोपाळा…’ मावळ तालुक्यात शाळांमध्ये दहीहंडीचा उत्साह