वडगाव मावळ शहरात श्री पोटोबा महाराज देवस्थान येथील हनुमान मंदिरामध्ये गोकुळाष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. दिनांक 31ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. बुधवारी (दिनांक 6 सप्टेंबर) मध्यरात्री श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा करण्यात आला. ह.भ.प. बाबाजी महाराज काटकर यांचे देव जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी दहीहंडीचा कार्यक्रम झाला आणि शुक्रवारी काल्याच्या महाप्रसादाने कार्यकर्माची सांगता झाली.
अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रथम दिवशी देवस्थान विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते अभिषेक, विनापुजन होऊन कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर दररोज पहाडीचे विणेकारी मान्यवर ग्रामस्थांनी आपला मान घेऊन संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री काकडा आरती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, असे नियोजन या अखंड हरिनाम सप्ताहचे करण्यात आले होते. ( harinam saptah on occasion of lord shri krishna jayanti in vadgaon maval kalashtami 2023 )
काल्याच्या महाप्रसादाचे नियोजन सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर यांच्या परिवाराचे वतीने करण्यात आले होते. तसेच संपूर्ण सप्ताहचे नियोजन देवस्थान मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त गणेशआप्पा ढोरे, अनंता कुडे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले, ऍड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे यांसह काकडा आरती भजनी मंडळचे शंकरराव म्हाळसकर, विनेकरी बबनराव भिलारे, सुदामराव पगडे, पंढरीनाथ भिलारे, विठ्ठलराव ढोरे, मधुकर पानसरे, शिवाजी शिंदे, शिवाजी होणावळे, सोमनाथ ढोरे, नंदकुमार म्हाळसकर, संतोष ढोरे आदींनी केले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शिवनेरी प्रतिष्ठान गोविंदा पथकानं फोडली वडगाव शहरातील मानाची दहीहंडी; 1 लाख 51 हजारांचं मिळालं बक्षीस
– मोठी बातमी! मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, पाहा तालुक्यात कुठे किती पाऊस झालाय
– ‘गोविंदा रे गोपाळा…’ मावळ तालुक्यात शाळांमध्ये दहीहंडीचा उत्साह