मावळ गर्जना प्रतिष्ठान वडगाव मावळचे वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वडगाव चे ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थान प्रांगणात भव्य प्रांगणात आकर्षक रक्कम रुपये ६,६६,६६६/- व भव्य चषक बक्षिसासह या दहीहंडी , स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होत. या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, लोणावळा येथील तब्बल १७ गोविंद पथकांनी नियोजनबद्ध, हर्षोल्हासात, जोशपूर्ण वातावरणात सहा /सात थरांचे मनोरे रचून दहीहंडी आणि उपस्थित प्रेक्षकांना सलामी देण्यात आली. वडगाव तसेच मावळ तालुक्यातील हजारो नागरिक हा भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.
यावर्षीची दहीहंडी फोडण्याचा मान राजे ग्रुप घाटकोपर – मुंबई यांनी पटकावला. प्रशासनाच्या सूचनेनुसार रात्री १०:०० वा. दहीहंडी फोडण्यात आली आणि एकच जल्लोष झाला जय भवानी, जय शिवाजी, गोविंदा रे गोपाळा बोल बजरंग बली की जय च्या जयघोषात आसमंत निनादला. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीचे व श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून प्रत्यक्ष दहीहंडी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या वेळी हंडीचे पूजन मयुर ढोरे माजी नगराध्यक्ष,रुपेश म्हाळसकर अध्यक्ष मनसे मावळ तालुका, सायलीताई म्हाळसकर माजी उपनगराध्यक्ष, सोपानराव म्हाळसकर मुख्य विश्वस्त पोटोबा देवस्थान, अवीकेंदू गुप्ता व्यवस्थापकीय संचालक वेट अँड जॉय आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ( Maval Garjana Pratishthan Dahihandi 2023 Vadgaon City MNS Rupesh Mhalaskar )
त्याचप्रमाणे या दहीहंडी सोहळ्यास शुभेच्छा व भेट देण्यासाठी श्रीरंग बारणे खासदार मावळ लोकसभा, सुनील शेळके आमदार मावळ विधानसभा, सचिन चिखले शहराध्यक्ष/गटनेते/समन्वयक मनसे पिंपरी चिंचवड, राजेंद्र म्हाळसकर संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ शिक्षण संस्था, प्रभाकर ओव्हाळ जेष्ठ साहित्यिक, अरुण वाघमारे सचिव ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सायली बोत्रे अध्यक्षा भाजपा युवती महिला मावळ, रविंद्र भेगडे अध्यक्ष भाजपा मावळ, अंजली बवरे – मा ग्रामपंचायत सदस्या, पंढरीनाथ ढोरे मा. संचालक खरेदी विक्री संघ मावळ, अरुण चव्हाण, किरण भिलारे, अनंता कुडे, तुकाराम ढोरे, चंद्रकांत ढोरे,सुभाष जाधव आदी विश्वस्त पोटोबा देवस्थान, विजय सुराणा, गणेश विनोदे, बाळासाहेब वाघमारे, सुदेश गिरमे आधी पत्रकार;
तसेच नगरसेवक – वडगांव न. पं., वडगाव नगरपंचायतीचे माजी नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, राहुल ढोरे, दिनेश ढोरे, राजेंद्र कुडे, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, मंगेश खैरे, रवींद्र म्हाळसकर, पूजा वहिले, अर्चना म्हाळसकर, सुनिता भिलारे, दिपाली मोरे, कुमार कदम साहेब पो.नि. वडगांव पो. स्टेशन, सुनिल शिंदे उद्योजक, मावळ मनसेचे पदाधिकारी – सुरेश जाधव, अनंता तिकोणे, साहेबराव तेलगु, सूरज भेगडे, शोभा कळसकर, संगिता गुजर, अर्चना ढोरे, राजू भानुसघरे, रुपेश जाधव, गणेश भांगरेउपस्थित होते. यावेळी उपस्थित गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रुपेश म्हाळसकर व सायलीताई म्हाळसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन तानाजी तोडकर, कु ओंकार भांगरे यांनी केले, तर विकास साबळे, दिनेश म्हाळसकर, महेंद्र शिंदे, संग्राम भानुसघरे, अजिंक्य शिंदे, शुभम म्हाळसकर, अनिल नायर, संतोष म्हाळसकर, नवनाथ शिवेकर, आकाश वारींगे,विक्रम कदम, जयंत कुंभार, गणेश मालपोटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन पार पडले. सागर शेलार,अरुण म्हाळसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल! राजकारणात अस्पृश्यता पाळत असल्याची टीका
– शिवनेरी प्रतिष्ठान गोविंदा पथकानं फोडली वडगाव शहरातील मानाची दहीहंडी; 1 लाख 51 हजारांचं मिळालं बक्षीस
– मोठी बातमी! मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, पाहा तालुक्यात कुठे किती पाऊस झालाय