व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होणार आहे. या मिसिंग लिंकमुळे प्रवाशांच्या वेळ आणि इंधन बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 26, 2026
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई आणि पुणे ही दोन प्रमुख शहरं आता आणखी जवळ आली आहे. या दोन्ही शहरांमधील प्रवासाचे अंतर आता आणखी कमी झाले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण कडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) एक मोठा टप्पा गाठला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतिक्षित 13.3 किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प 1 मेपासून म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होणार आहे. या मिसिंग लिंकमुळे प्रवाशांच्या वेळ आणि इंधन बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे.

या नवीन मार्गामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचे प्रवासाचे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोरघाटातील तीव्र वळणे आणि चढ-उतार टाळता आल्यामुळे प्रवासाचा वेळ किमान 30 मिनिटांनी घटणार आहे. विशेष म्हणजे, या हाय-टेक मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कोणताही अतिरिक्त टोल भरावा लागणार नाही.

सुरुवातीला फक्त कार आणि बसला एंट्री
वाहतुकीच्या नियोजनासाठी MSRDC ने सुरुवातीच्या 6 महिन्यांसाठी या मार्गावर केवळ कार आणि बस यांसारख्या वाहनांनाच परवानगी दिली आहे. अवजड वाहने आणि धोकादायक मालाची वाहतूक करणारे ट्रक सध्या जुन्या घाट सेक्शनचाच वापर करतील. एक्सप्रेसवेवरील एकूण रहदारीपैकी सुमारे 70 टक्के हिस्सा कार आणि बसचा असतो, तर 30 टक्के वाहतूक अवजड वाहनांची असते. या निर्णयामुळे जुन्या घाटातील वाहतुकीचा ताण 70 टक्क्यांने कमी होऊन तिथे होणारे अपघात आणि ट्रॅफिक जामची समस्या सुटण्यास मदत होईल.

या प्रकल्पामध्ये दोन मुख्य बोगद्यांचा समावेश असून त्यांची लांबी 8.9 किलोमीटर आणि 1.9 किलोमीटर इतकी आहे. यातील 8.92 किलोमीटर लांबीचा आणि 23.5 मीटर रुंदीचा बोगदा हा आशियातील सर्वात लांब रस्ते बोगद्यांपैकी एक मानला जात आहे. या विक्रमी रुंदीमुळे या प्रकल्पाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये होण्याची दाट शक्यता असून आवश्यक निरीक्षणे पूर्ण झाली आहेत. याशिवाय, टायगर व्हॅलीमध्ये 180 मीटर पेक्षा जास्त उंचीवर 650 मीटर लांबीचा दिमाखदार ‘केबल-स्टेड’ पूल उभारण्यात आला आहे. याचे काम एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Afcons Infrastructure Ltd) या कंपनीने केले आहे.

या प्रकल्पाचा वर्क ऑर्डर 2019 मध्ये देण्यात आला होता, परंतु प्रत्यक्ष कामाला 2021 मध्ये वेग आला. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेली बांधकाम साहित्याची टंचाई, घाट क्षेत्रातील अतिवृष्टी आणि वेगवान वारे यामुळे प्रकल्पाच्या पूर्णत्वास काही काळ विलंब झाला. मात्र, आता सुमारे 1,000 कामगारांच्या मदतीने एप्रिलअखेरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण केली जात आहेत.

प्रचंड वाहतुक कोंडीतून होणार सुटका
नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शनिवार-रविवार दरम्यान लोणावळा आणि खंडाळा घाटात होणाऱ्या प्रचंड कोंडीतून या मिसिंग लिंकमुळे सुटका होणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आशियातील सर्वात प्रगत इंजिनिअरिंग प्रकल्पांपैकी एक असलेला हा मार्ग महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमधील एक मानाचा तुरा ठरणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
– तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा
– सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी
– लोणावळा शहरात ‘व्हिला’ ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा


dainik maval jahirat

Previous Post

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

Next Post

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.