व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

२३ एप्रिल १९९५ रोजी पहिला जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 24, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : २३ एप्रिल १९९५ रोजी पहिला जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. त्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. या दिवसाला कॉपीराइट दिवस किंवा आंतरराष्ट्रीय पुस्तक दिवस म्हणूनही ओळखले जाते. याच दिनाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या प्रकारे हा पुस्तक दिन साजरा केला.

Novel NIBR Ads

मराठी विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचा एक भाग म्हणून पुस्तके परीक्षणासाठी दिली होती. प्रत्येक विद्यार्थ्याने बारकाईने पुस्तक वाचणे आणि वाचलेल्या पुस्तकाचे चिंतन, मनन करून आपल्याला पुस्तकाविषयी जे समजले ते आपल्या शब्दात लिहायचे, असा या अंतर्गत मूल्यमापनाचा हेतू होता.

हे पुस्तक परीक्षण करत असताना विद्यार्थ्यांनी चार्ट जीपीटी, जेमिनी, गुगल किंवा अन्य तस्सम साधनाचा वापर करू नये, अशा सूचनाही प्राध्यापकांनी दिल्या होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे, प्रा. डॉ. संदीप कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मागील पंधरा दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पुस्तक घ्यायला सांगितले होते.

आपण आपल्या आवडीनुसार निवडलेले पुस्तक पूर्ण वाचून त्यावर आपल्या भाषेत परीक्षण लिहायला लावले होते. तसेच हे लिहिलेले परीक्षण प्रत्येक विद्यार्थ्याने आपले स्वतःचा ब्लॉग अकाउंट तयार करून त्यावर प्रकाशित करायला सांगितले. त्यानुसार जवळपास २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या अभिनव उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यांनी आपल्या आवडीचे पुस्तक वाचून त्यावर परीक्षण वजा भाष्य करत आपण वाचलेले पुस्तक, त्याचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि त्या पुस्तकासोबतचा फोटो आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त ब्लॉगवर प्रसिद्ध केला आहे.

मराठी विभागाने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार निरुपा कानिटकर आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी केले.

Novel NIBR Ads

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम
– लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ
– वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन
– मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक


dainik maval jahirat

Previous Post

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

Next Post

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.