व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढवणे,मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलीचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 20, 2026
in पुणे, ग्रामीण, शहर
Lek-Ladki-Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून सुरु करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेअंतर्गत जिल्ह्यात १ एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेल्या ९ हजार ४८२ मुलींना मागील तीन वर्षात ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपये लाभ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे. तसेच या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पहिला हप्ता प्रति लाभार्थी रु ५ हजार रुपयाप्रमाणे सन २०२३-२४ मध्ये १ हजार ४० मुलींना ७० लाख रुपये, सन २०२४-२५ मध्ये ५ हजार ७२० मुलींना २ कोटी ८६ लाख रुपये आणि सन २०२५-२६ मध्ये २ हजार ३६२ मुलींना १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे.

मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढवणे,मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलीचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेच्या अटी शर्ती पुढील प्रमाणे :
लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. लाभार्थी बॅकेचे खाते असावे. कुंटुंबांचे वार्षिक उत्पन १ लक्ष पेक्षा जास्त नसावे. ही योजना पिवळया व केशरी शिधापत्रिकाधारक कुंटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या ए‍क अथवा दोन बालिकांसाठी लागू आहे. एक मुलगा व मुलगी असल्यास मुलीला लागू आहे.

मुलीच्या जन्मानंतर रक्क्म ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, इयत्ता सातवीत ७ हजार, इयत्ता अकरावीत ८ हजार, मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये असे मिळून १ लाख १ हजार रुपयाचा लाभ देण्यात येतो.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांनी जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासोबतच महिला सक्षमीकरणाकरिता प्रभावी योजनांची आखणी करून अंमलबजावणी करण्याचेनिर्देश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) आनंद खंडागळे यांनी दिली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद
– तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान 


Previous Post

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

Next Post

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.