व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

मंगलमय वातावरणात, हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत स्व.पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 16, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील ७ जोडपी विवाहबद्ध झाली. वडगाव मधील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे आणि सोहळा समिती अध्यक्ष अनिल कोद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या सोहळ्याची सुरुवात श्रींच्या अभिषेकाने झाली.

साखरपुडा प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, ज्येष्ठ नेते अशोक बाफना, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना घारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हापरिषद सभापती दीपाली हुलावळे, पल्लवी दाभाडे, सभापती सुनीता येवले, नगराध्यक्षा अबोली ढोरे, सुनीता कुडे, दिलीप ढोरे, राजेंद्र कडलक, प्राची गायकवाड, रेश्मा देवकर, सुनीता केदारी आदी उपस्थित होते.

यानंतर वधू-वरांचा हळदी समारंभ, वऱ्हाडी मंडळींचे भोजन तसेच नवरदेवांची भव्य मिरवणूक पार पडली. यावेळी जनरल हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पदाधिकारी व वऱ्हाडी मंडळींसह ट्रेडिंग ग्रुपच्या सदस्यांनी सहभाग घेतला.

सायंकाळी हजारो संख्येने उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडला. यावेळी आमदार सुनील शेळके व भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी वधूवरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी एकविरा देवस्थान अध्यक्ष दीपक हुलावळे, उपसभापती साहेबराव कारके, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, बाजार समिती सभापती सुभाषराव जाधव, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, पोटोबा महाराज देवस्थान अध्यक्ष किरण भिलारे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सोहळ्यातील अन्नदान केल्याबद्दल संचालक संजय दंडेल व रेणुका दंडेल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्वागत सोहळा समिती अध्यक्ष अनिल कोद्रे यांनी केले, प्रास्ताविक पंढरीनाथ ढोरे, सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव गणेश विनोदे, अतुल राऊत यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल कोद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष खंडुजी काकडे, कार्यक्रमप्रमुख संभाजी येळवंडे, उपाध्यक्ष सुधीर ढोरे, सचिव कार्तिक यादव, खजिनदार अक्षय बेल्हेकर, गणेश झरेकर, केदार बवरे, प्रतिष्ठानचे पदाधिकारी अर्जुन ढोरे, राजेंद्र वहिले, विलास दंडेल, रोहिदास गराडे, अजय धडवले, अरुण वाघमारे, काशिनाथ भालेराव, विवेक गुरव, अविनाश कुडे, सुनील शिंदे, सोमनाथ धोंगडे, शंकर ढोरे, महेश तुमकर, नंदकुमार ढोरे, बाळासाहेब तुमकर, विनय लवंगारे, प्रवीण कुडे, अनिकेत भगत, गणेश ढोरे, सुहास विनोदे, ओंकार तुमकर, सतीश गाडे, उमेश ढोरे, मंगेश तुमकर, शिवाजी येळवंडे, जितेंद्र ढोरे, महेश ढोरे, अर्पण ढोरे आदींसह महीला पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.

सोहळ्यातील वैशिष्टे
रक्तदान शिबिर
वऱ्हाडी मंडळींची बैठक व भोजन व्यवस्था
नवरदेवाची भव्य मिरवणूक
वधू वरांना संसारपयोगी भांडी, मनगटी घड्याळ, आकर्षक भेट
वधूंना चांदीचे अलंकार

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात
– पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संयुक्त संघटनेने घेतली आमदार सुनील शेळके यांची भेट
– मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर


Previous Post

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

Next Post

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

house of widow Shalan Dahibhate in Bedse Maval was gutted in fire caused by short circuit

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

May 20, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

May 20, 2026
ECI Central Election Commission

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
fadnvis shinde pawar

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

May 19, 2026
Pune District Collector Jitendra Dudi

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

May 19, 2026
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.