व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

स्थानिक शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध, आजी-माजी लोकप्रतिनिधींची स्थानिकांना साथ ; बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 14, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील बौर, ब्राम्हणवाडी आणि करुंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला रविवारी ( दि. १२ एप्रिल ) रोजी अधिकृत सुरुवात करण्यात आली. याच अनुषंगाने संबंधित जमिनींची पहिली मोजणीही करण्यात आली असून पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने राबवण्यात येणार आहे.

या मोजणी प्रक्रियेदरम्यान मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पार पडले. यावेळी नायब तहसीलदार गणेश तळेकर, मंडल अधिकारी शिवाजी जाधव तसेच भूमी अभिलेख विभागाचे उपअभियंता नितीन सुर्यवंशी उपस्थित होते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि कृषी विभागाचे अधिकारीही या प्रक्रियेत सहभागी झाले होते. संबंधित क्षेत्रातील पायाभूत सुविधा, जलस्रोत आणि शेतीवर होणारा परिणाम याचा प्राथमिक आढावा घेण्यात आला.

स्थानिक शेतकऱ्यांचा या संभाव्य एमआयडीसी ला प्रचंड विरोध होत असून ग्रामस्थांनी जमीन मोजणीस विरोध केला आहे. स्थानिक आजी – माजी प्रतिनिधी यांचीही स्थानिकांना साथ मिळताना दिसत आहे. दरम्यान, जमीन मालकांना येत्या १५ तारखेपर्यंत हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी आपल्या हरकती संबंधित कार्यालयात नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रशासनाचे म्हणणे –
एमआयडीसी प्रकल्पामुळे या परिसरात औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र, भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांचे योग्य पुनर्वसन याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, पुढील टप्प्यात सविस्तर मोजणी, जमीनमालकांशी चर्चा आणि भरपाई संदर्भातील प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

एमआयडीसी प्रकल्प हा या परिसराच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून शेतकऱ्यांच्या सर्व हरकती आणि सूचना गांभीर्याने विचारात घेतल्या जातील. कोणत्याही जमीनमालकावर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाकडून पूर्ण काळजी घेतली जाईल. भविष्यात हा परिसर विकसित होत जाऊन हिंजवडीप्रमाणे आयटी व औद्योगिक केंद्र म्हणून उभा राहण्याची क्षमता आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे सुरेंद्र नवले, उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संयुक्त संघटनेने घेतली आमदार सुनील शेळके यांची भेट
– मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर
– जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा
– वडगावात स्व.पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा ; सात जोडप्यांचे होणार शुभमंगल सावधान


Previous Post

सांगली येथील राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मावळच्या शुभ्रा गाडे हिने पटकाविले सुवर्णपदक ; आंध्रप्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Next Post

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
Panchayat Samiti Education Department Maval NCP Students Congress honored students of class 10th and 12th

पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

May 29, 2026
INS Shivaji employee dies after falling into a gorge at Lions Point Lonavala

लोणावळा लायन्स पॉइंट येथील दरीत पडून ‘आयएनएस शिवाजी’मधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 29, 2026
Group prayers onthe occasion of Bakri Eid at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण

May 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.