व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर

पीएमआरडीएने मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 67 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 9, 2026
in पुणे, ग्रामीण, शहर
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी आणि हवेली हे निसर्गाचा वरदहस्त लाभलेले तालुके असून येथील विविध ठिकाणे पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे ही पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी पीएमआरडीएकडून पर्यटन विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे.

पीएमआरडीएने मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 67 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष यांनी या प्रकल्पांना मान्यात दिली असून, यात रस्ते विकास, पार्किंग, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थांवर विशेष भर दिला जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी देखील त्याबाबत सूचना दिल्यानंतर आता या कामांना आता गती मिळाली आहे. यामुळे ट्रेकर्स आणि पर्यटकांना दुर्गम भागात पोहोचणे अधिक सुखकर होणार आहे.

खडकवासला धरण परिसराचा होणार कायापालट
खडकवासला धरण परिसर पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून जाते; मात्र, परिसरात पार्किंग, स्वच्छता आणि सुरक्षेचा अभाव असल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) 1 कोटी रुपयांच्या निधीतून येथे सुसज्ज चौपाटी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेसाठी धरणाच्या कडेला ‌‘चेनलिंक फेन्सिंग‌’ (संरक्षक कुंपण) उभारले जाणार आहे.

लोणावळा स्कायवॉक प्रकल्प
मुळशी तालुक्यातील पळशे धबधबा येथे दरड कोसळण्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी संरक्षक जाळ्या, रेलिंग आणि रस्ते सुधारणेला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच मुळशी तलावाचे सुशोभीकरण आणि पार्किंगसाठी 2 कोटींची तरतूद आहे. हडशी येथील श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्रासाठी 3 कोटी, तर मुगाव ते ताम्हिणी घाट दरम्यानच्या 14 कि.मी. रस्त्यासाठी 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय मावळमधील लोणावळा येथे 822 कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा ‌‘स्कायवॉक‌’ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

मंदिर परिसराचा विकास
पुणे जिल्हयातील 8 धार्मिक स्थळांचा परिसर आणि विकासाच्या दृष्टीने कामे सुरू करण्यात येणार आहे. त्यातील श्री चिंतामणी गणपती मंदिर, महादेव मंदिर, एकविरा देवी मंदिर, श्री महागणपती मंदिर, मळाईदेवी मंदिर, बनेश्वर महादेव मंदिर आणि श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी सोलर व्यवस्था, वाहनतळ, निवारा शेड, पिण्याच्या पाणी आणि स्वच्छतागृहे अशी सुमारे 47 कोटींची कामे देखील उभारण्यात येणार आहे.

27 गावांत ‌‘एसटीपी‌’
पर्यटन विकासासोबतच पर्यावरण रक्षणासाठी खडकवासला आणि पवना धरण क्षेत्रातील 27 गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी 1 हजार 209 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. धरणे आणि नद्यांचे प्रदूषण रोखण्यास मदत होईल. या नवीन स्ट्रक्चरल प्लानमुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटनाला नवी ओळख मिळणार असून, स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

गड-किल्ल्यांच्या कनेक्टिव्हिटीसाठी
1. राजमाची किल्ला: 14 कि.मी. रस्त्यासाठी 17 कोटी रुपये.
2. लोहगड किल्ला : 5.50 कि.मी. रस्त्यासाठी 7 कोटी रुपये.
3. तिकोना व पवना परिसर: 6.50 कि.मी. रस्त्यासाठी 8 कोटी रुपये.
4. तुंग किल्ला : 4 कि.मी. रस्त्यासाठी 6 कोटी रुपये.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात
– दुर्देवी घटना ! टाकवे बुद्रुक येथे विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
– अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी राज्यातील १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत
– मावळ तालुक्यात दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजूरी द्यावी ; बाळा भेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


dainik maval jahirat

Previous Post

श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

Next Post

जांभूळ जॅकवेलमधून पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा, नागरिकांनी पाणी उकळून व फिल्टर करून वापरावे – वडगाव नगरपंचायत

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Muddy water supply from Jambhul Jackwell citizens should filter water and use it Vadgaon Nagar Panchayat

जांभूळ जॅकवेलमधून पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा, नागरिकांनी पाणी उकळून व फिल्टर करून वापरावे - वडगाव नगरपंचायत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.