व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तेरा संचालकांच्या राजीनाम्यामुळे बाजार समितीचे कामकाज कोरम अभावी (गणपूर्ती) ठप्प

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 15, 2026
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील महिना भरापासून घडलेल्या विविध नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर आज मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त झाली आहे.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचे १७ आणि भाजपा च्या पॅनलचे १ संचालक निवडून आले होते. त्यानंतर पुढील दोन वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडीत भाजपाच्या गोटात ५ आणि राष्ट्रवादीच्या गोटात १३ संचालक राहिले. दरम्यान बाजार समितीवर राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमतातील सत्ता असतानाही नुकत्याच झालेल्या सभापती निवडीत भाजपाच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. यामुळे संतप्त झालेले आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीच्या सर्व संचालकांना राजीनामे देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तेराही संचालकांनी राजीनामे सादर केले होते.

दरम्यान तेरा संचालकांच्या राजीनाम्यामुळे बाजार समितीत अवघे पाच संचालक राहिले. यामुळे बाजार समितीचे कामकाम होण्यासाठी आवश्यक त्या संचालकांची उपस्थिती नसणे अर्थात गणपूर्ती ( कोरम ) होत नसल्याने सलग दोन बैठका रद्द झाल्या. याच्या आधारे प्रकाश ल. जगताप जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था ( पुणे ग्रामीण ) यांनी बाजार समिती बरखास्त करण्याचे आणि प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

संचालक मंडळ अस्तित्वात नसल्यामुळे समितीचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आणि पहिली बैठकही कोरम अभावी फक्त चर्चेपुरतीच मर्यादित राहिली. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सहाय्यक निबंधकांकडून जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आला. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 अंतर्गत कलम 45(1) नुसार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण)  प्रकाश जगताप यांनी आदेश काढत तळेगाव दाभाडे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मावळ, जि. पुणे, नवनाथ अनपट यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आता समितीचे सर्व अधिकार त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

आमदार सुनील शेळके यांची यशस्वी खेळी :
राष्ट्रवादीचे बहुमत असतानाही भाजपाचा सभापती निवडून आल्याने संपूर्ण राज्यात मावळच्या या प्रकरणाची चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या पदरी मोठी नामुष्की आली. यामुळे संतप्त होऊन आमदार सुनील शेळके यांनी सर्व संचालकांचे राजीनामे घेतले होते. यानंतर आता थेट बाजार समिती बरखास्त झाल्याने सभापती म्हणून निवडून येऊनही भाजपाचे सुभाष जाधव यांना काम करता आलेले नाही.

दुसरीकडे पक्षांतर्गत असंतोष, फुटीरता आणि त्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी घेतलेला कठोर निर्णय यामुळे संपूर्ण समीकरण बदलले असून पक्षशिस्तीचा नवा धडा आता कार्यकर्त्यांसह नेत्यांना मिळाला आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संयुक्त संघटनेने घेतली आमदार सुनील शेळके यांची भेट
– मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर
– जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा
– वडगावात स्व.पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा ; सात जोडप्यांचे होणार शुभमंगल सावधान


Previous Post

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

Next Post

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.