व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

वडगाव मावळ येथील मिलिंद युवक मंडळ ट्रस्ट आणि संघमित्रा महिला मंडळ यांच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन करण्याक आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 15, 2026
in लोकल, शहर
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ येथील मिलिंद युवक मंडळ ट्रस्ट आणि संघमित्रा महिला मंडळ यांच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन करण्याक आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात धम्म वंदना, बुद्ध वंदना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवर, मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर आयोजित विशेष धम्म प्रवचनात धम्ममित्र धम्मचारी विवेक मित्र यांनी बुद्ध धम्म, समता, बंधुता, शिक्षण, स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि संघटन यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्या ॲड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सखोल मांडणी करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. मंडळाचे मार्गदर्शक, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, संभाजी मोरे, सुशीला ओव्हाळ मा. ग्रा. पंचायत सदस्य, राजेंद्र ओव्हाळ यांनी मार्गदर्शन केले.

संयुक्त जयंती महोत्सव कमिटीचे उपाध्यक्ष अनिल भागूजी ओव्हाळ यांनी मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास, विविध सामाजिक उपक्रम आणि कार्याची माहिती दिली. याप्रसंगी संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता ओव्हाळ, सीमा ओव्हाळ, श्रद्धा भालेराव, सरिता आल्हाट यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

जयंती सोहळ्याचे संपूर्ण नियोजन समन्वय आणि यशस्वी आयोजन मिलिंद युवक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष देवकुमार भिकाजी ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे जेष्ठ सभासद, विश्वस्त, संघमित्रा महिला मंडळ, संयुक्त जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, ॲड नितीन ओव्हाळ, ॲड मिलिंद ओव्हाळ, नगरसेवक अजय भवार, संदीप हिरभगत, नितीन आल्हाट, अतुल ओव्हाळ, किरण ओव्हाळ, अबिद सय्यद, प्रकाश गायकवाड, आशिष भालेराव, कार्यकर्ते व सदस्य यांनी समर्पित भावनेने परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संयुक्त संघटनेने घेतली आमदार सुनील शेळके यांची भेट
– मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर
– जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा
– वडगावात स्व.पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा ; सात जोडप्यांचे होणार शुभमंगल सावधान


Previous Post

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

Next Post

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो... ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका - मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.