व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

स्थानिक व्यावसायिकांच्या मते हे स्कॅम लोणावळ्याबाहेरील टोळ्यांकडून चालवले जात असून यामुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायाची बदनामी होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 23, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यासाठी पर्यटक ऑनलाइन सर्चिंग करीत असतात. याचदरम्यान नवख्या पर्यटकांना काही भामटे सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट व्हिला अथवा बंगल्यांच्या बुकिंगच्या नावाखाली आर्थिक गंडा घालत असल्याचे उघड झाले आहे.

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यांकडून व्हिला – बंगल्यांचे आकर्षक फोटो, कमी दर आणि आकर्षक ऑफर्स दाखवून पर्यटकांना आमिष दाखविले जाते. त्यानंतर बुकिंग निश्चित करण्याच्या नावाखाली २० ते २५ हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतली जाते. अनेकदा विश्वास बसावा म्हणून संबंधित ठिकाणाचे लाईव्ह लोकेशनही पाठवले जाते. मात्र प्रत्यक्षात पर्यटक लोणावळ्यात पोहोचल्यानंतर सांगितलेल्या ठिकाणी कुठलाही व्हिला किंवा बंगला अस्तित्वात नसल्याचे समोर येते. यातून पर्यटक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत.

अशा पद्धतीने फसवणूक झालेल्या मुंबईतील एका पर्यटकाने याबद्दल सांगितले आहे. “पैसे भरल्यानंतर आम्हाला व्हिलाचे लोकेशन पाठविण्यात आले. मात्र, लोणावळ्यात त्या पत्त्यावर पोहोचलो तेव्हा तिथे कोणताही व्हिला किंवा बंगला अस्तित्वातच नव्हता.”

दरम्यान अशा वाढत्या प्रकारांमुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यटन व्यवसायावर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तविली असून प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

स्थानिक व्यावसायिकांच्या मते हे स्कॅम लोणावळ्याबाहेरील टोळ्यांकडून चालवले जात असून यामुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायाची बदनामी होत आहे.

दरम्यान अशा सायबर फसवणुकीपासून बचावासाठी सजगता हाच उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पर्यटकांनी बुकिंग करताना केवळ अधिकृत आणि विश्वसनीय संकेतस्थळांचाच वापर करावा, व्यवहारापूर्वी माहितीची खातरजमा करावी, तसेच अनोळखी लिंक, संशयास्पद ऑफर आणि अतिशय स्वस्त दरांच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम
– लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ
– वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन
– मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक


dainik maval jahirat

Previous Post

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

Next Post

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.