व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न । Vadgaon Maval

या होत असलेल्या विकासकामांसाठी नेमलेल्या संबंधित ठेकेदारांना सदरची विकासकामे दर्जेदार पद्धतीने करण्यासाठी नगराध्यक्षा अबोली ढोरे, स्थानिक नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, पुनम भोसले यांनी सूचना दिल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 25, 2026
in लोकल, शहर
Bhumi Pujan of various road development works in Keshavnagar area of ​​Vadgaon Nagar Panchayat Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत वडगाव नगरपंचायत हद्दीतील केशवनगर मधील प्रभाग क्रमांक १ मधील विविध रस्ते विकासकामांसाठी उपलब्ध निधीतून होणाऱ्या कामांचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी (दि. २५) संपन्न झाला.

यामध्ये आप्पा कदम यांच्या घरापासून ते अर्पण ढोरे पोल्ट्री ते बाबर यांच्या निवासस्थानापर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक १ येथील विकी भोसले यांच्या घरापासून ते सांगवी रस्त्यापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक १ येथील जगताप यांच्या घरापासून ते सांगवी रोड पर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक १ येथील मातोश्री बिल्डिंग ते माळी निवासस्थान ते गुरुकृपा बिल्डिंग ते सांगवी रोड पर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे इत्यादी विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ संपन्न झाला.

याप्रसंगी नगराध्यक्षा अबोली ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक अजय भवार, नगरसेवक अजय म्हाळसकर, नगरसेवक गणेश म्हाळसकर, नगरसेविका पुनम भोसले, नगरसेविका सुनिता ढोरे, नगरसेविका वैशाली सोनवणे, विकी भोसले, गौतम सोनवणे, अनिल गुरव, गणेश ढोरे, अर्पण ढोरे आणि नगरपंचायत अधिकारी, ठेकेदार तसेच स्थानिक महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्कालीन नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या कार्यकाळात या कामांना मंजुरी मिळाली होती. तद्नंतर आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून या सर्व विकासकामांसाठी सुमारे ६१ लक्ष रुपये इतका भरीव निधी उपलब्ध झाल्याने केशवनगर मधील अनेक रस्त्यांची रुंदीकरणाची कामे मार्गी लागणार आहेत.

या होत असलेल्या विकासकामांसाठी नेमलेल्या संबंधित ठेकेदारांना सदरची विकासकामे दर्जेदार पद्धतीने करण्यासाठी नगराध्यक्षा अबोली ढोरे, स्थानिक नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, पुनम भोसले यांनी सूचना दिल्या.

येणाऱ्या काळात आमदार साहेबांच्या माध्यमातून वडगाव कातवीच्या सर्वांगीण विकासासाठी अजून भरीव निधी उपलब्ध होणार आहे. आज प्रथमताः ज्या ज्या प्रभागांमध्ये ही विकास कामे होत आहेत, त्या त्या प्रभागांतील सन्माननीय नगरसेवकांनी नव्याने होणारी ही विकासकामे दर्जेदार पद्धतीने करून घेण्यासाठी जातीने लक्ष देऊन पुढाकार घ्यावा अशी सर्वांना नगराध्यक्षांनी विनंती केली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम
– लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ
– वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन
– मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक


dainik maval jahirat

Previous Post

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

Next Post

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
young man from Buldhana died while swimming in Pawana river near Bebadohal Maval

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.