तळेगाव दाभाडे शहराजवळील घोरावडी रेल्वे स्टेशन जवळ आज (शनिवार, दिनांक 16 सप्टेंबर) सकाळच्या सुमारास एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला आहे. ह्या तरुणाचा मृत्यू कशाने झाला असावा याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. परंतू डोक्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आहे. तसेच उजव्या हातावर VISHAL (विशाल) असे नाव इंग्रजीत गोंदवलेले आहे. तसेच उजव्या हातात राख्या असून गळ्यात रुद्राक्षाचा मणी आहे. सदर युवकाच्या मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असून त्याची ओळख पटल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन्यजीव रक्षक आणि आपदा मित्र निलेश गराडे यांनी ही माहिती दिली.
घोरावडी रेल्वे, तळेगाव दाभाडे, कामशेत ह्या रेल्वे स्थानकांजवळ यापुर्वीही असे अनेक अनोळखी मृतदेह सापडल्याच्या घटना घडल्या आहे. रात्रीच्या वेळी लोहमार्ग ओलांडताना वेगवान रेल्वे गाड्यांचे धक्के बसल्याने किंवा रेल्वे गाड्यांतून पडूनही अनेकजण दगावले आहे. अतिवेगाने घडणाऱ्या या घटनांमध्ये सदर व्यक्ती अत्यंत गंभीर जखमी होतात, त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प : ‘…एक कणभरही काम सुरु केले जाणार नाही’, पालकमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
– मोठी बातमी! गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात दारू विक्रीला बंदी, वाचा काय आहे आदेश?
– दारुंब्रे गावात आरोग्य शिबिर, 69 रुग्णांची मोफत तपासणी, अनेक तज्ज्ञांकडून उपयुक्त मार्गदर्शन