पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठवल्याने गुरुवारी (दिनांक 14 सप्टेंबर) रोजी सर्वपक्षीय कृती समितीने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचे कणभरही काम सुरू केले जाणार नाही. तसेच पालकमंत्री या नात्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. ( Pavana Closed Canal Project )
पवना बंदिस्त जल वाहिनी संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी यांनी बाळा भेगडेंसह भेट घेतली. पवना बंदिस्त जल वाहिनी संदर्भात 8 सप्टेंबर रोजी बंदी उठवण्याचा आदेश काढण्यात आला होता. त्यामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. ह्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांची मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली.
सदर बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय ‘कणभर’ काम सुरू केले जाणार नाही. तसेच लवकरच आपण पालकमंत्री या नात्याने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत मावळ मधील शेतकऱ्यांची तातडीने बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. ( Pavana Closed Canal Project Maval All party delegation met Guardian Minister Chandrakant Patil )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी! तळेगाव दाभाडे ते किल्ले रायगड थेट एसटी बस सेवा, दिनांक 30 सप्टेंबरपासून होणार सुरु
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प : राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आरपीआय वाहतूक आघाडी मैदानात
– मावळच्या आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत सोमाटणेतील ‘त्या’ 3 मराठा युवकांचे थेट मुख्यमंत्र्यांना निवदेन