मावळ तालुक्यातील शिवभक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मावळ तालुक्यातून आता रायगड जिल्ह्यातील स्वराज्य राजधानी असलेल्या किल्ले रायगड इथे जाण्यासाठी थेट एसटी बस सेवा सुरु होत आहे. गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्था वडगाव मावळ आणि तालुक्यातील सर्व शिवभक्त यांच्या प्रयत्नातून शनिवार दिनांक 30 सप्टेंबर 2023 पासून ही बससेवा सुरु होत आहे. ( direct st bus service from talegaon dabhade city maval taluka to raigad fort )
मावळ तालूक्यातून किल्ले रायगड करिता थेट एसटी बस सेवा नसल्याने शिवभक्तांना परिवारासह किल्ले रायगडावर जाण्याकरिता अडचण येत होती. ह्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता तळेगाव दाभाडे एसटी आगारातुन दर शनिवार – रविवारी किल्ले रायगड करिता एसटी बस सेवा चालू होत आहे, अशी माहिती गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगाव मावळ यांच्याकडून देण्यात आली.
वेळ : ही बस तळेगाव दाभाडे येथून सकाळी 6 वाजता किल्ले रायगडच्या दिशेने निघेल तर, किल्ले रायगड येथून परतीचा प्रवास संध्याकाळी 5 वाजता सुरु होईल.
बुकींग : बससाठी बुकिंग सुविधा ही ऑनलाईन देखील उपलब्ध असणार आहे.
बस थांबे : तळेगाव दाभाडे – लोणावळा – खोपोली – पाली – महाड – किल्ले रायगड ह्या ठिकाणांवर बस थांबेल, अशी माहिती तळेगाव दाभाडे बस डेपोचे आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी दैनिक मावळला दिली.
तळेगाव दाभाडे ते रायगड बस सेवेमुळे होणारे फायदे;
- लोणावळा करिता पर्यायी प्रवाशी वाहतूकीची सोय
- अष्टविनायक गणपतींपैकी आठवा गणपती श्री बल्लाळेश्वर दर्शन शक्य
- पाली जवळील सरसगड आणि सुधागड पैकी एक किल्ला एका दिवसात पाहणे शक्य
- उन्हेरे गरम पाण्याचे कुंड पाहता येणार
- मार्गावरील स्थानिक नागरिकांना ह्या बससेवेचा फायदा होणार
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळच्या आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत सोमाटणेतील ‘त्या’ 3 मराठा युवकांचे थेट मुख्यमंत्र्यांना निवदेन
– मोठी बातमी! धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी मीडियम शाळांमध्ये असलेली प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय
– पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठवल्यामुळे मावळमधील सर्वपक्षीय कृती समितीचा मोठा निर्णय! लगेच वाचा…