मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी मावळ तालुक्यातील नरेंद्र मुऱ्हे, निखिल मुऱ्हे, स्वप्निल मुऱ्हे हे तीन युवक रविवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी सोमाटणे येथून पायी प्रवास करत मुंबईच्या दिशेने निघाले होते. हे तिघेही जण आज (बुधवार, दिनांक 13 सप्टेंबर) रोजी मुंबई इथे पोहोचले. त्यावेळी मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी ह्या युवकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट करुन दिली.
यावेळी तिघांनीही मराठा आरक्षणासंदर्भातील समाज बांधवांच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. तसेच त्यांनी मागणीचे निवेदनपत्रही दिले. मुख्यमंत्र्यांनीही यावेळी, सरकार सकारात्मक भावनेने आणि जलदगतीने सदर विषयावर काम करत असल्याचे सांगितले. तसेच आमदार शेळकेंनीही ‘मराठा समाजाच्या भावनांचा विचार करुन राज्य सरकार लवकरच न्याय देईल, अशी आशा बाळगतो’ असल्याचे म्हटले. ( Three Maratha Youth From Maval Taluka gave Letter to Chief Minister Eknath Shinde )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शिंदे-फडणवीस-पवार यांचा ‘तो’ पसरवलेला व्हिडिओ चुकीचा? मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, ‘अत्यंत खोडसाळपणाने…’
– मावळ तालुक्यातील 10 शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड, इनर व्हील क्लबचा उपक्रम
– मोठी बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच होणार आठपदरी, राज्य रस्ते विकास महामंडळाचा सरकारला प्रस्ताव