इनर व्हील क्लबचे यंदाचे 100 वे वर्ष आहे. तसेच इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडेचेही नुकतीच 25 वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्त क्लबच्या विद्यमान अध्यक्षा संध्या थोरात यांनी सर्व माजी अध्यक्षांच्या नावांचा बोर्ड बनवून क्लब हाऊसमध्ये बसवून घेतला. त्याचे अनावरण क्लबच्या जिल्हा अध्यक्षा रचना मालपाणी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मालपाणी यांनी तळेगाव दाभाडे क्लबच्या विद्यमान अध्यक्षा संध्या थोरात उत्तम प्रकारे काम करत असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच सर्व कार्यकारिणीचे सुव्यवस्थित कामकाजाबाबत कौतुक केले.
ह्यावेळी मावळातील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी निवड केलेल्या गुणवंत शिक्षकांचा रचना मालपाणी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुढील शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ( Nation Builders Award to 10 teachers from Maval Taluka initiative of Inner Wheel Club )
- यशश्री शशिकांत कदम (जि. प. शाळा धामणे)
- दुर्गा राम भेगडे (पु. वा. परांजपे विद्यालय, तळेगांव दाभाडे)
- शारदा विनायक वाघमारे (नवीन समर्थ विद्यालय, तळेगांव दाभाडे)
- संतोष तुकाराम मेरगळ (श्री तुळजाभवानी विद्यालय, सोमाटणे)
- डॉ. संकेत दि. पोंक्षे (रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतन, तळेगांव दाभाडे)
- नम्रता शशिकांत गायकवाड (जि. प. प्राथमिक शाळा, गोडुंब्रे)
- हर्षाली विलासराव निंबाळकर (संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. ६, तळेगांव दाभाडे)
- छाया सुनील गाडे (लोकमान्य टिळक प्रा. शाळा क्र ३, तळेगांव दाभाडे)
- शेख बलम बादशाह ( आदर्श विद्या मंदिर)
- दत्तात्रय कोकाटे(नथुभाऊ भेगडे स्कूल)
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोठी बातमी! कृषी सेवक पदभरतीसाठी 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या प्रक्रिया
– लोणावळा इथे ‘राज्य उत्पन्न आणि संबंधित आकडेवारी’ विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन । Pune News
– कामशेत – वडगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि सार्वजनिक गणेश मंडळे, पोलिस पाटील यांच्यात नियोजन बैठक संपन्न