आज मंगळवार (दिनांक 12 सप्टेंबर 2023) रोजी सकाळी 11 वाजता तनिष्का मंगल कार्यालय (कान्हे) इथे आगामी गणेशोत्सव 2023 अनुषंगाने नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. कामशेत पोलीस स्टेशन आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून संयुक्तरित्या या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कामशेत आणि वडगाव ह्या दोन्ही पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गावांतील सार्वजनिक गणेश मंडळे आणि पोलीस पाटील यांच्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. ( planning meeting was held between Ganesha Mandals in Kamshet Vadgaon Police Station limits )
सदर बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक हे उपस्थित होते. आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध गावच्या पोलिस पाटलांना योग्य मार्गदर्शन केले आहे. सदर नियोजन बैठकीला पंचायत समिती मावळ येथील सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील, एमएसईबी मावळ तालुका सहा. अभियंता संदीप रेवडकर, आरोग्य विभाग पंचायत समिती मावळ सहा ठोंबरे, प्राथमिक आरोग्य केंद्र कामशेत डॉक्टर विकास जाधव, वडगाव नगरपंचायत कुंभार, मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघ अध्यक्ष विजय सुराणा, गणेश विनोदे, महादेव वाघमारे अन्य पत्रकार बंधू आदी उपस्थित होते.
“सदर नियोजन बैठकीच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना व माहिती देण्यात आली आहे. तसेच गणराया अवॉर्ड बाबतही माहिती दिली गेली. सदर नियोजन बैठकीला आम्ही आणि पोलिस निरिक्षक कुमार कदम (वडगाव मावळ पो स्टे) यांनी गणेशोत्सव अनुषंगाने सर्व अटी शर्ती माहिती दिली आहे. गणेश उत्सव ऑनलाईन अर्ज भरणे प्रक्रिया तसेच इतर सर्व शासकीय विभागाच्या परवानगी बाबत माहिती दिली आहे.” – रवींद्र पाटील ( पोलीस निरीक्षक – कामशेत पोलीस ठाणे )
“वडगाव, कामशेत मावळ पोलिस स्टेशन आयोजित गणेशोत्सव 2023 नियोजन बैठकीत गणेश मंडळांना येणाऱ्या अडीअडचणी विषय पोलिस प्रशासनाला काही सुचना केल्या. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणपती मुर्ती विसर्जन करण्यासाठी विशेष घाट करावा, तसेच गणेश मंडळांना लाईट संदर्भात काही अडचणी येतात याविषयी महावितरण विभागाने सहकार्य करावे, अशा सुचना मांडल्या.” – अतुल राऊत
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लोणावळ्यात हजारो नागरिकांनी एकाचवेळी घेतली नशा मुक्तीची शपथ! IPS सत्यसाई कार्तिक आणि शहर पोलिसांचा उपक्रम
– ‘सामान्य कुटुंबातील तरुणाची गरुडझेप’, लेखक-दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांचा खास आंतरराष्ट्रीय सन्मान
– स्तुत्य उपक्रम! आंदर मावळातील आदिवासी बांधवांना कपडे आणि आवश्यक साहित्यांचे वाटप, खेळणी पाहून मुले सुखावल