पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल आणि लोणावळा विभागाचे अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून संकल्प नशामुक्ती अभियान ( Sankalp Nashamukti Abhiyan ) राबवण्यात येत आहे. ह्या अभियानांतर्गत लोणावळा शहरातील सर्वात मोठी आणि मानाची पहिली दहीहंडी असलेल्या मावळ वार्ता फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात नशामुक्ती व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. ( Thousands of Peoples took oath to be drug free during Lonavala Dahi Handi Festival )
लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मावळ वार्ता फाउंडेशनची लोणावळा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी असते. यावर्षी दिनांक 7 सप्टेंबर (गुरुवार) रोजी दहीहंडीच्या निमित्ताने उपस्थित 5000 हून अधिकच्या जनसमुदायाला नशामुक्तीचा संदेश देण्याचा विचार सत्यसाई कार्तिक ( IPS Sathya Sai Karthik ) यांनी मांडला. त्यानुसार ‘स्वतंत्र थिएटर ग्रुप’ यांच्या माध्यमातून नशामुक्ती – व्यसनमुक्ती यांचा संदेश देणारे पथनाट्य जनसमुदायासमोर सादर करण्यात आले. पथनाट्यातून तरुण तरुणींना नशेपासून अलिप्त राहण्ययाचा संदेश देण्यात आला. तसेच सत्यसाई कार्तिक यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना नशेपासून दूर राहण्याचा मंत्र दिला. हजारो नागरिकांनी यावेळी नशा मुक्तीची शपथ घेतली.
यावेळी मावळ वार्ता फाउंडेशन दहीहंडी उत्सवाचे पदाधिकारी, नियोजनकर्ते, लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल, लोणावळा शहर पोलिस स्टेशनचा स्टाप, तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि अन्य मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– Breaking! शिंदे सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठवली; मावळातील नेत्यांचे अपयशी प्रयत्न
– दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
– सर्वात मोठी बातमी! कोपर्डी बला’त्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीची येरवडा कारागृहात आत्म’हत्या