उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार, दिनांक 13 सप्टेंबर) मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मागण्या आणि प्रलंबित विषयांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली प्रवेशसंख्या वाढविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली ही योजना इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक सवलती देणारी आधार योजना इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्यासाठी प्रस्ताव आणण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ( decision to increase enrollment of dhangar community students in english medium schools )
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशू सिन्हा आदी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील 10 शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड, इनर व्हील क्लबचा उपक्रम
– मोठी बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच होणार आठपदरी, राज्य रस्ते विकास महामंडळाचा सरकारला प्रस्ताव
– पुसाणे गावातील बेकायदा हातभट्टीची दारू बनवणाऱ्या कारखान्यावर शिरगाव पोलिसांचा छापा; 7 लाखांचे रसायन नष्ट