राज्य सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला. ह्या निर्णयाच्या विरोधात मावळ तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, संघटना यांचे नेते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. बुधवारी सर्वपक्षीय कृती समिती मावळ यांच्याकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अनेक पक्ष प्रशासनाला निवेदन देत आपली भुमिका स्पष्ट करत आहे. यातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतूक आघाडी यांनीही उडी घेतली असून मावळ तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन दिले आहे. ( moratorium on pavana closed water channel project was lifted RPI Transport Alliance letter to tehsildar maval )
काय आहे निवेदन पत्र?
निवेदन पत्राच्या सुरुवातीलाच आरपीआय वाहतूक आघाडीकडून महाराष्ट्र राज्य सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी केली आहे. “मावळ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आजपर्यंतच्या संघर्षाला अखेर राज्य सरकारच्या निर्णयामुळे अपयश आले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडी ही पहिल्यापासून पवना बंद जलवाहिनी विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे आजही आणि यापुढेही उभी आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटची बांधिलकी बांधावरील शेतकऱ्यांशी आहे. या बंदिस्त जलवाहिनीसाठी मावळ तालुक्यातील कित्येक शेतकरऱ्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले. त्या शेतकरऱ्यांचे बलिदान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कदापी व्यर्थ जावू देणार नाही. राज्य सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा आणि मावळ तालुक्यातील शेतकरऱ्यांना व तमाम मावळवासियांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पश्चिम महाराष्ट्रच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा रस्त्यावर उतरून शेतकरयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट स्वस्थ बसणार नाही याची राज्य सरकारने दखल घेऊन हा प्रकल्प कायमस्वरूपी तालुक्यातून हद्दपार करावा.” अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख शशिकांत रघुनाथ बेल्हेकर यांनी हि माहिती माध्यमांना दिली. ( moratorium on pavana closed water channel project was lifted RPI Transport Alliance letter to tehsildar maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठवल्यामुळे मावळमधील सर्वपक्षीय कृती समितीचा मोठा निर्णय! लगेच वाचा…
– शिंदे-फडणवीस-पवार यांचा ‘तो’ पसरवलेला व्हिडिओ चुकीचा? मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, ‘अत्यंत खोडसाळपणाने…’
– मावळ तालुक्यातील 10 शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड, इनर व्हील क्लबचा उपक्रम