काँग्रेस ( Congress ) पक्षाला तब्बल 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत झाली होती. यात मल्लिकार्जून खरगे यांनी शशी थरूर याचा पराभव केला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ व अनुभवी नेते मल्लिकार्जुन @kharge हे भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या ऐतिहासिक निवडणुकीत नवनिर्वाचित अध्यक्षांचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम करण्याचा संधी चिरकाल स्मरणीय राहील pic.twitter.com/q2j87gqZPU
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 19, 2022
स्वातंत्र्यलढ्याचा दैदिप्यमान इतिहास असलेल्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांचं मनःपूर्वक अभिनंदन! ते आपल्या कार्यकाळात काँग्रेसला पुनर्वैभव प्राप्त करुन देतील, असा विश्वास आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!
@kharge pic.twitter.com/0PscupVp9n
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 19, 2022
मल्लिकार्जून खरगे यांना एकूण 7897 मते मिळाली, तर शशी थरूर यांना 1072 मते मिळाली आहेत. तसेच, 416 मते अवैध ठरली आहेत. एकंदरीत 90 टक्क्यांच्या जवळपास मते मिळवून मल्लिकार्जू खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. ( Mallikarjun Kharge Wins Congress Presidential Elections Against Shashi Tharoor With 7897 Votes )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! कामशेतजवळ भीषण अपघात, मंत्री संदीपान भुमरेंच्या बंधूचा मृत्यू I Kamshet Accident
– ‘उठा उठा दिवाळी आली… किल्ले बनवायची वेळ झाली’, मावळमधील कुंभार समाजाकडून मातीचे सैनिक बनवायची लगबग