व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात विवाहितेचा छळ; पती, सासूसह 5 जणांवर गंभीर आरोप, गुन्हा दाखल I Lonavla City Crime

लोणावळा ( Lonavla City ) येथे एका विवाहित महिलेचा सासरकडील काही मंडळींनी कौटुंबिक छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 21, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Lonavla-City-Police-Station

Photo Courtesy : File Photo : Lonavla City Police Station


लोणावळा ( Lonavla ) येथे एका विवाहित महिलेचा सासरकडील काही मंडळींनी कौटुंबिक छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित फिर्यादी महिलेने लोणावळा शहर पोलिसांत ( Lonavla City Police ) फिर्याद दाखल केली आहे. पती, सासू यांसह कुटुंबातील 5 जणांविरोधात शारिरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार फिर्यादीने नोंदवली आहे. ( Harassment of Married Woman in Lonavala City )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हिने लोणावळा पोलिसांत सासरकडील कुटुंबियांविरोधात हिंसाचार आणि छळवणूकीची ( Harassment of Married Woman ) तक्रार दाखल केली आहे. दिनांक 11 जून 2016 पासुन ते आजपर्यंत (2022) सातत्याने सासरकडील कुटुंबीयांनी यात पती, सासू, नणंद, दीर, जाऊ सर्वजण राहणार सोनार गल्ली, एफ-48 मौजे लोणावळा) यांच्याकडून आपल्याला मारहाण करणे, अपमानास्पद बोलणे, जातीवरुन बोलणे आदी प्रतारे छळ केल्याचे  ( Family Harassment of Married Woman ) फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. तसेच दिराने एकदा शारिरिक लगट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे.

हेही वाचा – लोणावळा ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; बनावट सोन्याच्या विटा विकणाऱ्या टोळीचा म्होरक्या गजाआड

फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सासरकडील या 5 जणांविरोधात भारतीय दंड संहिता कायदा कलम 498 (अ) 354, 323, 504, 506, 34 अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंद कायदा 1989 चे 3 (1) (r) (s), 3 (2) (va), 6 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरील प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक डुबल साहेब हे करत आहेत. ( Domestic Harassment of Married Woman By In-laws At Lonavala city )

अधिक वाचा –

– मोठी बातमी! कामशेतजवळ भीषण अपघात, मंत्री संदीपान भुमरेंच्या बंधूचा मृत्यू I Kamshet Accident
– ‘उठा उठा दिवाळी आली… किल्ले बनवायची वेळ झाली’, मावळमधील कुंभार समाजाकडून मातीचे सैनिक बनवायची लगबग


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! काँग्रेसला मिळाला नवा ‘हायकमांड’, खरगे-थरूर यांच्यातील अध्यक्षपदाच्या लढतीत ‘यांनी’ मारली बाजी

Next Post

श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्नेहालय संस्थेला 500 साड्या, लहान मुलांसाठी कपडे आणि 25 हजारांची देणगी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Abhanga-Pratishthan-Dehu

श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्नेहालय संस्थेला 500 साड्या, लहान मुलांसाठी कपडे आणि 25 हजारांची देणगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.