महागाव ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी योगिता केशव सावंत यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. मावळत्या उपसरपंच यांचा ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा सादर केला. त्यामुळे रिक्त पदासाठी सरपंच गोरख डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. ( Yogita Sawant Elected Deputy Sarpanch of Mahagaon Group Gram Panchayat Maval )
यावेळी उपसरपंच पदासाठी योगिता केशव सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने सभेचे अध्यक्ष सरपंच यांनी सावंत यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी अध्यक्ष सरपंच गोरख डोंगरे, तर सचिव म्हणून ग्रामसेवक साळवी यांनी काम पाहिले. तसेच, ग्रामसदस्य संतोष घारे, स्वाती बहिरट, राणी साबळे, उर्मिला पडवळ, यमुना मरगळे यांसह गावातील अनेक नागरिक उपस्थितीत होते. निवडीनंतर गुलालाची उधळण करुन पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महागावच्या सरपंचपदी काही दिवसांपूर्वीच डोंगरे यांची निवड –
महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काही दिवसांपूर्वीच गोरख डोंगरे यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सोपान सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतू राजीनामा सुनावणीच्या वेळी तो राजीनामा दिला नसल्याचे सांगण्यात आले आणि सरपंच पदाचा वाद न्यायालयात गेला होता. त्यामध्ये ग्रामपंचायतीचे आठ महिने गेले. या कार्यकाळात उपसरपंच बहिरट यांनी प्रभारी सरपंच म्हणून काम पाहिले. अखेर सरपंचपदाच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी गोरख डोंगरे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी गोरख डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महाराष्ट्राची कुस्तीपटू क्षितिजा मरागजे हिची मध्यप्रदेशात झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कामगिरी
– काँग्रेस (आय) पक्षाच्या वडगांव मावळ शहर अध्यक्षपदी बाळासाहेब चव्हाण यांची नियुक्ती । Maval Taluka Politics
– एकता प्रतिष्ठाण डोणे आयोजित श्री डोणुआई देवी नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी चैत्राली लांडगे यांची निवड