व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महागाव ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी योगिता सावंत बिनविरोध । Gram Panchayat Election

महागाव ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी योगिता केशव सावंत यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 9, 2023
in लोकल, ग्रामीण
Mahagaon-Village-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


महागाव ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी योगिता केशव सावंत यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. मावळत्या उपसरपंच यांचा ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा सादर केला. त्यामुळे रिक्त पदासाठी सरपंच गोरख डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. ( Yogita Sawant Elected Deputy Sarpanch of Mahagaon Group Gram Panchayat Maval )

Novel NIBR Ads

यावेळी उपसरपंच पदासाठी योगिता केशव सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने सभेचे अध्यक्ष सरपंच यांनी सावंत यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी अध्यक्ष सरपंच गोरख डोंगरे, तर सचिव म्हणून ग्रामसेवक साळवी यांनी काम पाहिले. तसेच, ग्रामसदस्य संतोष घारे, स्वाती बहिरट, राणी साबळे, उर्मिला पडवळ, यमुना मरगळे यांसह गावातील अनेक नागरिक उपस्थितीत होते. निवडीनंतर गुलालाची उधळण करुन पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महागावच्या सरपंचपदी काही दिवसांपूर्वीच डोंगरे यांची निवड –

महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काही दिवसांपूर्वीच गोरख डोंगरे यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सोपान सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतू राजीनामा सुनावणीच्या वेळी तो राजीनामा दिला नसल्याचे सांगण्यात आले आणि सरपंच पदाचा वाद न्यायालयात गेला होता. त्यामध्ये ग्रामपंचायतीचे आठ महिने गेले. या कार्यकाळात उपसरपंच बहिरट यांनी प्रभारी सरपंच म्हणून काम पाहिले. अखेर सरपंचपदाच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी गोरख डोंगरे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी गोरख डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महाराष्ट्राची कुस्तीपटू क्षितिजा मरागजे हिची मध्यप्रदेशात झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कामगिरी
– काँग्रेस (आय) पक्षाच्या वडगांव मावळ शहर अध्यक्षपदी बाळासाहेब चव्हाण यांची नियुक्ती । Maval Taluka Politics
– एकता प्रतिष्ठाण डोणे आयोजित श्री डोणुआई देवी नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी चैत्राली लांडगे यांची निवड

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

जनरल मोटर्सच्या कामगारांचे उपोषण : ‘सरकारला कामगारांचे देणे-घेणे नाही, स्वतःचे हित जपण्यात सरकार व्यस्त’ – रोहित पवार

Next Post

मोठी बातमी! मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी लगेच वाचा, पुणे लेन ‘इथे’ बंद राहणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mumbai-pune-expressway

मोठी बातमी! मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी लगेच वाचा, पुणे लेन ‘इथे’ बंद राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.