व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवा; खासदार बारणेंचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

पुणे-लोणावळा दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आग्रही झाले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 14, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


पुणे-लोणावळा दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आग्रही झाले आहेत. खासदार बारणे यांनी रेल्वेच्या विभागीय बैठकीत याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सकाळी दहा ते दुपारी पावणे तीन या कालावधीत एकही लोकल नसते. त्यामुळे प्रवासी विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाने मधल्या काळात लोकल सुरु करावी, असे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापुर विभागाची बैठक शनिवारी (दि. 14) पार पडली. या बैठकीसाठी खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजीतसिंग निंबाळकर, खासदार जयसिद्धेश्वर महाराज, खासदार धैर्यशील माने, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार वंदना चव्हाण, महाव्यवस्थापक नरेश लालवानी, पुणे विभागाच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे, उप महाव्यवस्थापक अजय मिश्रा, वरिष्ठ मुख्य परिवहन व्यवस्थापक श्याम सुंदर गुप्ता, वरिष्ठ मुख्य सुरक्षा आयुक्त अजोया सदानी, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानासपुरे आदी उपस्थित होते.

  • बैठकीत बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा कार्यक्षेत्रात येणाऱ्या दापोडी ते लोणावळा दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. सुरु असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करून प्रवाशांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याच्या सूचना दिल्या. सकाळी 10.05 वाजता लोणावळा स्थानकावरून लोकल आहे. त्यानंतर सुमारे पावणे पाच तास एकही लोकल नाही. दुपारी 02.50 वाजता नंतरची लोकल सुटते. वडगाव, कान्हे, कामशेत, मळवली या परिसरातून लोणावळा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. अनेक नागरिक वेगवेगळ्या कामांसाठी लोणावळा शहरात जात असतात.

तब्बल पावणे पाच तास लोकल नसल्याने या सर्वांची गैरसोय होते. शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी रेल्वे स्थानकावर बसतात. इथे अपघात तसेच अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यात बराच वेळ रेल्वे स्थानकावर गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे मधल्या कालावधीत लोकल सुरु करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निरीक्षण खासदार श्रीरंग बारणे यांनी मांडले. मधल्या काळात मेंटेनन्सची कामे केली जात असल्याचे रेल्वेकडून सांगितले जाते. मात्र ही कामे इतर वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे खासदार बारणे यांनी सांगतिले.

कान्हे फाटा येथे रेल्वे उड्डाणपूल उभारण्याच्या कामासाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र तिथे जमीन संपादित करण्यासाठी काही अडचणी येत आहेत. त्यामुळे रेल्वे विभाग आणि राज्य शासन यांची संयुक्त बैठक घेऊन त्यावर मार्ग काढावा. तसेच वडगाव येथील भूमिगत मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु करावे, अशा सूचना देखील खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे विभागाला दिल्या आहेत.

तळेगाव स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा द्या –

सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. ही गाडी सुरु झाल्यानंतर तिला तळेगाव स्थानकावर थांबा देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सिंहगड एक्सप्रेसला तळेगाव येथे थांबा देण्यासाठी तांत्रिक बाबींची पडताळणी सुरु आहे. पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी ब्लॉकच्या कारणास्तव बंद केली आहे. ही गाडी सुरु झाल्यानंतर तिला देखील तळेगाव येथे थांबा दिला जाणार आहे.

रेल्वे स्थानकांवरील कामे प्रगतीपथावर –

तळेगाव, आकुर्डी, देहूरोड, चिंचवड अशा विविध रेल्वे स्थानकांचा अमृत स्टेशन योजनेत सहभाग झाला आहे. त्याअंतर्गत या रेल्वे स्थानकांवर मागील काही कालावधीपासून नवीन पादचारी मार्ग, फलाटांची लांबी, फलाटावरील विविध सुविधा, फलाटांची उंची अशी विविध कामे केली जात आहेत. दापोडी ते लोणावळा दरम्यानच्या सर्व स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम केले जात आहे. चिंचवड, आकुर्डी, दापोडी, देहूरोड, घोरावाडी, कामशेत, कासारवाडी, मळवली, तळेगाव, वडगाव स्थानकांवर दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा केली आहे. चिंचवड येथे कव्हर ओव्हर शेड, सीओपी, स्टेशन सर्क्युलेटिंग एरियाची कामे प्रगतीपथावर आहेत. आकुर्डी येथे नवीन लिफ्ट उभारण्यात आली आहे. लोणावळा स्थानकाचे मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण केले जाणार आहे.

अधिक वाचा –
– मावळचे आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानकडून लेक लाडकी योजनेचा शुभारंभ । Vadgaon Maval
– मनोज जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटी येथील विराट सभेसाठी मावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून मोठी मदत!
– धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना; जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती


Previous Post

मोठी बातमी! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान 10 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंद, वाचा संपूर्ण आदेश

Next Post

राज्यात 8 महिन्यात 29 हजार 807 महिला-मुली हरवल्याच्या तक्रारी; 5 हजार 495 अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेण्यात यश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

राज्यात 8 महिन्यात 29 हजार 807 महिला-मुली हरवल्याच्या तक्रारी; 5 हजार 495 अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेण्यात यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.