वडगाव मावळ शहरातील मोरया महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व लेक लाडकी योजनेचा शुभारंभ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आयुष्यमान भारत योजना अंतर्गत वडगाव शहरातील पाच हजार नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना कार्ड काढून देण्यात येणार तसेच लेक लाडकी योजनेंतर्गत शहरातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी या शासकीय योजनांचा मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.
दिनांक 1 एप्रिल 2023 नंतर पिवळ्या व केसरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येक मुलीला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 1 लाख 1 हजार रुपये इतका लाभ टप्प्याटप्प्याने मिळून देण्यात येईल. शासकीय जीआर प्रसिद्ध झाल्यानंतर लेक लाडकी या योजनेची सविस्तर (अटी, शर्ती) माहिती देण्यात येईल. अधिक माहितीसाठी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील विविध गावांच्या पोलिस पाटील पदांचा निकाल जाहीर; 12 गावात महिला पोलिस-पाटील, वाचा संपूर्ण यादी
– ‘पीएमपीएल’कडून वडगाव मावळ ते कात्रज थेट बससेवा बंद! प्रवाशी, नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल; बससेवा पुर्ववत करण्याची मागणी
– इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राज्याकडून केंद्राला सादर; प्रकल्पासाठी 577 कोटींचा खर्च अपेक्षित, 54 गावांमध्ये होणार काम