व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या सहकार्याने सोमाटणेतील जिल्हा परिषद शाळा बनली ‘हॅप्पी स्कूल’

राज्यात आजही अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था ठिक नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयी आणि असुविधांना तोंड द्यावे लागते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 18, 2023
in लोकल, ग्रामीण
Inner-Wheel-Club-Talegaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्यात आजही अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था ठिक नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयी आणि असुविधांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विद्यार्थी संख्या रोडावते. कष्टकरी समाजातील विद्यार्थ्यांना पैशाअभावी खाजगी शाळेत प्रवेश घेता येत नाही. अशीच 80 पटसंख्या असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी सोमाटणे मध्ये इयत्ता पहिली ते चौथीची मुले इथे शिक्षण घेतात. ( Inner Wheel Club of Talegaon Dabhade adopted Zilla Parishad School Vitthalwadi Somatne )

मोल मजुरी करणाऱ्या पालकांची ही मुले आहेत. मुलांच्या अंगात ताप असला तरी पालक त्यांना शाळेत सोडून कामावर जातात अशी अवस्था आहे. त्यांच्यासाठी साध्या वह्या, कंपास बॉक्स, दप्तरे घेणेही पालकांना शक्य होत नाही. त्यामुळे इनर व्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडे च्या अध्यक्षा संध्या थोरात यांनी मावळातील अनेक शाळांचा सर्व्हे करून या शाळेला दत्तक घेऊन हॅप्पी स्कूल प्रोजेक्टसाठी निवडले.

गेले तीन ते चार महिने या शाळेवर काम चालू होते. असंख्य देणगीदारांच्या मदतीने शाळेत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या. विद्यार्थ्यांना प्यायला शुद्ध पाणी मिळावे म्हणून वॉटर प्युरिफायर, लायब्ररीसाठी लाकडी कपाट, मुलांना बसायला बेंचेस तसेच शालोपायोगी साहित्य, वह्या, कंपास बॉक्स, स्कूल बॅग्ज, खेळाचे साहित्य, ई लर्निंग कीट इत्यादी साहित्य भेट दिले. यासाठी एकूण 82 हजार खर्च आला. मुलांच्या आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही देऊन गेला.

अनेक दानशूर हात यासाठी पुढे आले. मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, सचिन मुऱ्हे, विनायक आगळे, सारिका भेगडे, अर्चना देशमुख, डॉ. दीपाली झंवर, मंगल पवार, ममता मराठे, मंजुश्री जुडे, डॉ लीना कवितके, इंद्राणी दास, अभिषेक तिवारी, बसनगोंड कडोली यांनी खारीचा वाटा उचलला आणि शाळेतील विद्यार्थ्यांना आनंदी केले.

या सर्व गरजा पूर्ण केल्यावर शाळेच्या भिंतीवर हॅप्पी स्कूलचा बोर्ड लावण्यात आला. त्याच्या अनावरणासाठी शाळेतील विद्यार्थी, सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. इनर व्हील क्लब तळेगांव दाभाडेच्या अध्यक्षा संध्या थोरात, सचिव निशा पवार, एडिटर आरती भोसले यांनी बोर्डचे अनावरण केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अधिक वाचा –
– इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल संस्थेला देशातील ख्यातनाम संस्थेकडून पुस्कार
– जनरल मोटर्सच्या कामगारांबाबत ‘वर्षा’वर बैठक संपन्न; मुख्यमंत्री शिंदेंचा कामगारांना शब्द, मंत्री सामंत गुरुवारी उपोषणस्थळी येणार
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल


dainik maval jahirat

Previous Post

रस्ते, गृहनिर्माण संस्थांच्या पायाभूत सुविधांबाबत गुरुवारी महापालिकेत बैठक; खासदार श्रीरंग बारणेंची माहिती

Next Post

आदिवासी कुटुंबीयांसाठी सेवा अभियान; आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Seva-Abhiyan-for-Tribals

आदिवासी कुटुंबीयांसाठी सेवा अभियान; आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.