पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : लहानपणी ही चिमुरडी-गोड-चुणचुणीत मुलगी शाळेतल्या विविध वक्तृत्व स्पर्धामध्ये बक्षीसं मिळवायची… स्नेहसंमेलनात उत्साहाने भाग घेऊन छान नाच करायची… नाट्य प्रशिक्षण शिबिरात उत्स्फूर्तपणे जायची… दूरचित्रवाणी वाहिनीवरील विनोदी एकपात्री सादरीकरण कार्यक्रमही हिनं गाजवला… एकूणच काय तर “अभिनय व व्यासपीठावर काही ना काही सादर करणं” ही गोष्टच तिला फार फार आवडू लागली. महाविद्यालयात गेल्यावरही तिची अभिनयाची आवड तसूभरही कमी झाली नाही. अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असतानाही नाट्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायलाच जास्त आवडायचं. ( navratri special abhivadan navdurgana Dainik Maval )
आपल्या मुलीची आवड जाणून घेऊन आई-वडिलांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिले अन् घडली एक गुणी अभिनेत्री. ही सुंदरशी-लक्षवेधी वाटचाल आहे… आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री फुलराणी प्रियदर्शिनी इंदलकर हिची. ही वाटचाल घराघरातील मुली आणि आईला दिशा देणारी ठरेल.
प्रियदर्शिनी पुण्यातील कात्रजची. तिचे शालेय शिक्षण भावे स्कूल व रेणुका स्वरुप विद्यालयात झाले. अभियांत्रिकीची पदवी तिने उत्तम गुणांनी पूर्ण केली आहे. शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षणही घेतले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
- लहानपणापासूनच प्रियदर्शिनीचं पाठांतर चागंलं आहे. शाळेत अनेक वक्तृत्व स्पर्धेत मराठी, हिंदी व संस्कृत भाषेत भाषण सादर करुन तिनं पारितोषकं मिळवली. हरेक स्नेहसंमेलनात तिचा नाच असायचा. तिचे कलागुण ओळखून शिक्षकही तिला आवर्जून संधी द्यायचे. सुट्टीत फक्त खेळण्यात वेळ वाया जाऊ नये म्हणून पालक प्रियदर्शिनीला नाट्यसंस्कार कला अकादमीच्या नाट्य प्रशिक्षण शिबीरात पाठवायचे. त्यामुळे अभिनयाची आवड अधिक घट्ट झाली. दरम्यान, ईटीव्हीवरील अफलातून या कार्यक्रमात उत्तम एकपात्री सादर केल्याने प्रियदर्शिनीनी कार्यक्रम गाजवला. बालकलाकार प्रियदर्शिनीला लोक ओळखू लागले. भरतनाट्यम्’चं शिक्षणही तिनं घेतलं आहे.
पुढं, महाविद्यालयीन शिक्षण सुरु झाले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे शिक्षण घेण्याचं प्रियदर्शिनीचं स्वप्न होतं. त्यासाठी कोणत्याही शाखेचं पदवीधर असणं ही अट असल्याने तिनं अभियांत्रिकीची पदवी पूर्ण करायचे ठरवले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाही ‘नाटक’काकडेच प्रियदर्शिनीचा अधिक कल होता. अभ्यास सांभाळून तिनं फिरोदिया करंडक, पुरुषोत्तम करंडक या नाट्यस्पर्धा केल्या अन् बक्षीसंही मिळवून आपल्यातील अभिनय कौशल्य दाखवून दिलं. ( Actress Priyadarshini Indalkar Life Story Pune )
अभियांत्रिकीची पदवीधर होताच तिनं ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD)’मध्ये प्रवेश घेण्यासाठी तयारी सुरु केली. NSD च्या परीक्षा दिल्या, तिची निवडही झाली, दिल्लीला जाऊन तिनं काही कार्यशाळाही पूर्ण केल्या. परंतु, अंतिम फेरीत तिची निवड झाली नाही व प्रियदर्शिनी पुन्हा मुंबईला येऊन काम करु लागली.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रियदर्शिनीनं रुपेरी पडद्यावर खरया अर्थाने पदार्पण केले. पुण्याची अभिनेत्री प्रियदर्शिनी आता घरघरात पोचली. अलीकडेच आपण फुलराणी चित्रपटात तिला फुलराणीच्या मुख्य भूमिकेत पाहिलं आणि ‘अभिनेत्री’ म्हणून घडवायच्या तिच्या कारकिर्दीची दमदार सुरवात झालीये. तिनं स्वतःला सिध्द केलंय. खरंच फुलराणी आता बहरु लागलीये.
आपल्या करिअरसाठी ती सध्या मुंबईथ स्थायिक झाली आहे. काही project वर तिचं काम सुरु आहे. सध्या चित्रपट आणि वेबसीरिज करण्यास तिचं प्राधान्य असणार आहे. अनेकविध भूमिका तिला आगामी काळात साकारायच्या आहेत. अभिनेत्री म्हणून घडण्याच्या प्रवासात प्रियदर्शिनीच्या आई-बाबांनी ह तिचे कलागुण ओळखून तिला मनाप्रमाणे करिअर करु दिले. तिच्या आवडीला प्रोत्साहन दिले आणि करिअर घडताना ते सतत ते तिच्या सोबत राहीले, हे महत्वाचे आणि सर्व पालकांनीही लक्षात घेण्यासारखे आहे.
प्रियदर्शिनी सांगते की, “अभिनय क्षेत्रात रुजताना आपण या क्षेत्रात काही करु शकतो यावर आपल्या कुटुंबियांना विश्वास बसण्यासाठी वेळ द्यावा लागतो. हातात ठोस काम नसतानाचा काळ कठीण असतो. आपल्या कामातूनच आपल्यावरील विश्वास निर्माण करावा लागतो. आपण प्रयत्न करत राहायचे, कधीच थांबायचं नाही. मेहनतीचं फळ मिळतच. मुलींना या क्षेत्रात येताना या क्षेत्राचा अभ्यास करायला हवा. त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवायला हवा, कौशल्ये विकसित करायला हवी, मनापासून काम करायला हवं आणि स्वतःला सिध्द करायला हवं. रस्ते शोधले की संधी मिळतातच.”
अधिक वाचा –
– आदिवासी कुटुंबीयांसाठी सेवा अभियान; आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम । Vadgaon Maval
– इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या सहकार्याने सोमाटणेतील जिल्हा परिषद शाळा बनली ‘हॅप्पी स्कूल’
– रस्ते, गृहनिर्माण संस्थांच्या पायाभूत सुविधांबाबत गुरुवारी महापालिकेत बैठक; खासदार श्रीरंग बारणेंची माहिती