पीएमपीएमएल ( PMPML ) अर्थात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची ( Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited ) बससेवा मावळ तालुक्यातील शिळींब गावापर्यंत ( Shilimb Village Maval ) सुरु व्हावी, यासाठी ग्रुप ग्रामपंचायत शिळींब आणि ग्रामस्थ यांच्यावतीने विनंती वजा निवेदन पत्र पीएमपीएमएल व्यवस्थापनाला देण्यात आले आहे. ( Letter To Get PMPML Bus Service Up To Shilimb Village Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापक (ऑपरेशन अँड इंजिनिअर्स) सुबोध मेडसीकर ( Subodh Medseeker ) यांना प्रत्यक्षात भेटून शिळींब येथील नागरिकांच्या मागणीचे हे निवेदन ग्रामस्थांकडून देण्यात आले. त्यावर मेडसीकर यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करुन पुढील कारवाईसाठी हे पत्र नोंदवले आहे. तसेच त्याच वेळी पीएमपीएमएलची प्रवासी आणि व्यवस्थापन बद्दल महत्वाची बैठक सुरु असल्याने हे निवदेन पत्र थेट मुख्य निर्णय अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे संपूर्ण शिळींब ग्रामस्थ यांसह पंचक्रोशीतील गावांतील रहिवाशांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
भौगोलिक दृष्ट्या मावळ आणि मुळशी तालुक्याच्या सीमेवर असलेले शिळींब हे गाव तालुक्यातील एक मोठे गाव आहे. परंतू, दळणवळणाच्या दृष्टीने आवश्यक तितक्या सोईसुविधा गावात अद्याप उपलब्ध नाही. शिळींबसह आजूबाजूच्या आजिवली, जाधववाडी, वाघेश्वर, कादव, बोडशेळ, डोंगरवाडी ते पुढे चावसर, मोरवे, तुंग या गावांची परिस्थिती काही वेगळी नाही. तब्बल दीड हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेले शिळींब हे गाव उपरोक्त सर्व गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथून मावळ तालुक्यात तसेच मुळशी तालुक्यात शिक्षण, व्यापार, बाजार आदी कारणास्तव प्रवास करणारे विद्र्यार्थी, व्यापारी, प्रवासी यांची संख्या अधिक आहे. असे असतानाही या सर्व नागरिक प्रवाशांना प्रवासासाठी दळणवळणाची आवश्यक ती सोय उपलब्ध असल्याचे दिसत नाही. ( Letter To Get PMPML Bus Service Up To Shilimb Village Maval Taluka )
त्यामुळेच आजारपण, शिक्षण, खासगी प्रवास अशा दररोजच्या गोष्टींसाठी नागरिकांना कित्येकवेळ तिष्ठत बसावे लागते. वडगाव डेपोची एसटी बस सेवा ही सर्व गरजा पुर्ण करण्यात असमर्थ असल्याचे आता एव्हाना सर्वांच्याच निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुणे मार्केट यार्ड ते कोळवण, तसेच स्वारगेट ते काशिग गेट ही मुळशी तालुक्यातील गावांपर्यंत येणारी पीएमपीएमएलची बस पुढे अगदी 6-8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिळींब गावापर्यंत यावी, अशी आग्रही मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या या मागणीचा पीएमपीएमएल प्रशासन सकारात्मक विचार करुन नागरिकांची प्रवासाची समस्या मिटवेल, अशी आशा आहे.
अधिक वाचा –
– पुण्यश्री योजनेंतर्गत मावळमधील वडेश्वर येथील बचत गटाच्या विक्री केंद्राचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन
– ऐतिहासिक वारसा लाभलेला कुसुरघाट रस्ता लवकर व्हावा, स्थानिक ग्रामस्थांसह भाजपा विद्यार्थी आघाडीचे चंद्रकांत पाटलांना निवेदन, वाचा माहिती
– श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्नेहालय संस्थेला 500 साड्या, लहान मुलांसाठी कपडे आणि 25 हजारांची देणगी