पुणे जिल्हा परिषदेच्या ( Pune Zilla Parishad ) पुण्यश्री योजनेंतर्गत ( Punyashree Yojana ) मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) बचत गटाच्या विक्री केंद्राचे उद्घाटन बुधवार (19 ऑक्टोबर) रोजी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Guardian Minister Chandrakant Patil )यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील यांनी, देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास देशाच्या संपत्तीत भरीव वाढ होईल, असे मत व्यक्त केले.
पुण्यश्री महिला बचत गटाची उत्पादने आणि किराणा मालाचे दुकान याजनेंतर्गत मावळ तालुक्यातील वडेश्वर ( Vadeshwar village ) येथील संतोषी माता महिला स्वयंसहायता गटाच्या दुकानाचे ( Women Self Help Group Sales Centre ) उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी पुणे जिल्हा ( Pune District ) परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माजी आमदार दिगंबर भेगडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारगावकर, मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत आदी उपस्थित होते. ( Punyashree Yojana Maval Vadeshwar Women Self Help Group Sales Centre Opening By Guardian Minister Chandrakant Patil )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पूर्वी पुरुषांच्या बरोबरीने महिला शिक्षण घ्यायच्या. मात्र इ.स. 1200 नंतर विविध परकीय आक्रमकांमुळे महिलांना कुटुंबात बंद केले गेले. शेती, युद्धात, पुरुषांच्या बरोबरीने काम करणारी महिला घरात अडकून राहिली. स्वातंत्र्यानंतर शिक्षणात महिलांचे प्रमाण वाढले परंतु अर्थार्जनात त्यांचा टक्का अजूनही कमीच आहे. त्यामुळे देशाची संपत्ती वाढण्यात महिलांचे प्रमाण कमी राहिले आहे. आता केंद्र शासन महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात संधी देण्यासाठी धोरणे आणि योजना राबवत असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सन २०२२-२३ या वर्षात महिलांना व्यवसाय व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 'पुण्यश्री' या बचतगटनिर्मित उपक्रमाअंतर्गत मावळ तालुक्यातील मौजे वाडेश्वर येथे पहिल्या केंद्राचे उद्घाटन केले. तसेच नव्या अंगणवाडी इमारतीचेही उद्घाटन केले. pic.twitter.com/Cwq9Ue8yYZ
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) October 19, 2022
तसेच, देशाच्या आर्थिक विकासात महिलांचा वाटा असावा असा प्रयत्न असून त्यासाठी महिलांची बुद्धिमत्ता कामी आली पाहिजे. महिलांनी कोणताही व्यवसाय हौस म्हणून नव्हे तर उत्पन्न मिळवणे हा उद्देश ठेवून करावा. महिलेचा केवळ गृहिणी हा परिचय असू नये तर घरात बसूनही काहीतरी उत्पादन करते आणि त्यातून पैसा कमावते ही स्थिती झाली पाहिजे. बचत गटाच्या महिला पापड, लोणची अशा पारंपरिक उत्पादनातून सुरुवात करत आता अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करत असून त्यांना विक्रीची व्यवस्था करून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक केले.
यावेळी संतोषी माता बचत गटास 2 लाख अनुदानाचे पत्र चंंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. गटाच्या एका महिलेस 20 हजार याप्रमाणे 10 महिलांच्या गटास 2 लाख रुपये अनुदान आणि 5 लाख रुपये बँक कर्ज असे 7 लाख रुपयांतून बचत गटाने हे दुकान सुरू केले आहे. मंत्री पाटील यांनी बचत गटाच्या 1 हजार रुपयांच्या उत्पादनांची खरेदी केली. बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करून महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ( Punyashree Yojana Maval Vadeshwar Women Self Help Group Sales Centre Opening By Guardian Minister Chandrakant Patil )
अधिक वाचा –
– ऐतिहासिक वारसा लाभलेला कुसुरघाट रस्ता लवकर व्हावा, स्थानिक ग्रामस्थांसह भाजपा विद्यार्थी आघाडीचे चंद्रकांत पाटलांना निवेदन, वाचा माहिती
– उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्र आढावा बैठक संपन्न, दिले महत्वाचे निर्देश