व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्र आढावा बैठक संपन्न, दिले महत्वाचे निर्देश

उद्योगमंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठकीचे ( Talegaon Industrial Area Review Meeting ) आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 19, 2022
in महाराष्ट्र, ग्रामीण, लोकल, शहर
Industries-Minister-Uday-Samant-Talegaon

Photo Courtesy : FB / DIOPUNE


उद्योगमंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठकीचे ( Talegaon Industrial Area Review Meeting ) आयोजन करण्यात आले होते. तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा क्रमांक 1 साठी येत्या 15 दिवसात वाहन तळाची (ट्रक टर्मिनल) सुविधा करण्यात यावी, असे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.

बैठकीला एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारोग मुकादम, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, संजय देशमुख, उद्योजक आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ( Talegaon Industrial Area Review Meeting Concluded In Presence of Industries Minister Uday Samant )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

तळेगाव औद्योगिक क्षेत्रात सुविधा भूखंडाची व्यवस्था करण्यात यावी. उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासोबत नवीन उद्योजक आकर्षित होतील अशा सुविधा विकसित कराव्या. पुण्यात चांगल्या शैक्षणिक संस्था आणि गुणवत्ता असल्याने नव्या जागेचा विकास करताना विद्यार्थ्यांकडून संकल्पना आणि सूचना मागवण्यात याव्या. तज्ज्ञांच्या मदतीने उद्योजकस्नेही असणारा परिसर विकास करावा, अशा सूचना यावेळी सामंत यांनी दिल्या.

उद्योगमंत्री सामंत यांनी तळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांशी संवाद साधला. उद्योजकांना चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यांनी केलेल्या चांगल्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल. रस्ता रुंदीकरणाबाबतही विचार करण्यात येईल. उद्योजकांच्या नोंदणीकृत संघटनेच्या कार्यालयासाठी भूखंड देण्यात येईल. उद्योग आणण्यासाठी त्यांना उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. ( Industries Minister Uday Samant Held Review Meeting At Talegaon )

आज तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा १ साठी येत्या १५ दिवसात वाहन तळाची सुविधा करण्यात यावी, असे निर्देश सबंधित अधिकाऱ्यांना दिले.यावेळी, सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/CXnfHihkjU

— Uday Samant (@samant_uday) October 19, 2022

सामंत यांनी बैठकीपूर्वी तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा क्रमांक 2 साठी जागेची पाहणी केली. जागेसाठी संमतीपत्र दिलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर प्रथम रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, भूखंडाचा विकास करताना उद्योगाच्या गरजा लक्षात घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. मंत्री सामंत यांनी जेसीबी उद्योगाला भेट देऊन माहिती घेतली. राज्यात उद्योगविस्तार करण्यासाठी शासन सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा –

– ऐतिहासिक वारसा लाभलेला कुसुरघाट रस्ता लवकर व्हावा, स्थानिक ग्रामस्थांसह भाजपा विद्यार्थी आघाडीचे चंद्रकांत पाटलांना निवेदन, वाचा माहिती
– श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्नेहालय संस्थेला 500 साड्या, लहान मुलांसाठी कपडे आणि 25 हजारांची देणगी


dainik maval jahirat

Previous Post

ऐतिहासिक वारसा लाभलेला कुसुरघाट रस्ता लवकर व्हावा, स्थानिक ग्रामस्थांसह भाजपा विद्यार्थी आघाडीचे चंद्रकांत पाटलांना निवेदन, वाचा माहिती

Next Post

पुण्यश्री योजनेंतर्गत मावळमधील वडेश्वर येथील बचत गटाच्या विक्री केंद्राचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Women-Self-Help-Group-Sales-Opening-By-Chandrakant-Patil

पुण्यश्री योजनेंतर्गत मावळमधील वडेश्वर येथील बचत गटाच्या विक्री केंद्राचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.