व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके बनणार मंत्री? कार्यकर्त्यांकडून तालुक्यात बॅनरबाजी, वाचा काय आहे प्रकरण…

मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांचा दिनांक 20 ऑक्टोबर रोजी वाढदिवस असतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 22, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
MLA-Sunil-Shleke

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांचा दिनांक 20 ऑक्टोबर रोजी वाढदिवस असतो. यंदा आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. स्वतः आमदार सुनिल शेळके यांनी वाढदिवसाच्या दिवशी कुणाचीही भेट घेणे टाळले. परंतू तालुक्यातील त्यांच्या हजारो कार्यकर्ते समर्थक यांनी गावोगावी आमदार शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक छोटे मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. तसेच तालुक्यात सर्वत्र आमदारांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकले होते. या सर्व गोष्टींमध्ये आमदार सुनिल शेळके भविष्यात मंत्री होणार, असे मोठाले बॅनर लावून शेळकेंच्या मंत्रीपदाची चर्चाही तालुक्यात सुरु करण्यात आली. त्यामुळे मदन बाफना, बाळा भेगडे यांच्यानंतर आता सुनिल शेळके हेही मंत्री होणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.

लाल दिव्याची गाडी आणि भावी मंत्री…

मावळ तालुक्यात सुनिल शेळके यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे हजारो कार्यकर्ते आहेत. अशात लाडक्या आमदारांना भविष्यात मंत्री म्हणून पाहायची हौसही अनेक कार्यकर्त्यांना आहे. अशात आमदारांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी थेट भावी मंत्री आणि लाल दिव्याची गाडी अशा प्रकारचे बॅनक तालुक्यात जागोजागी झळवलेत. त्यामुळे आमदार सुनिल शेळके भविष्यात मंत्री होणार, याचाच दुसरा अर्थ पुन्हा आमदारही होणार, या चर्चांना उधाण आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार सुनिल शेळके हे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अत्यंत जवळचे आणि खास मानले जातात. तसेच स्वतः अजित दादांचे मावळवर विशेष लक्ष आहे. भविष्यात पक्षाच्या वाटचालीत मावळ सोबत असणे राष्ट्रवादीसाठी आवश्यक आहे. अशावेळी आमदार शेळकेंना मंत्री बनवण्याचा आणि तालुक्यावर पकड ठेवण्याचा मार्ग स्विकारला जाऊ शकतो, ही शक्यता नाकारता येणार नाही. ( MLA Sunil Shelke will become a minister Banners everywhere in Maval Taluka )

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval दैनिक मावळ (@dainikmaval)

परंतू, दुसरीकडे आमदार सुनिल शेळके यांची ही पहिलीच टर्म आहे. त्यामुळे पहिल्या टर्मचे काही महिने शिल्लक राहिलेले असताना त्यांना आता तरी मंत्रीपद मिळू शकते याची शक्यता धुसर आहे. परंतू पुढील निवडणूकीत ते जर पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरले, जर त्यांनी पुन्हा बाजी मारली आणि जर पुन्हा एकदा अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत असली तर किमान काही कालावधीसाठी का असेना शेळकेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते, हे नाकारता येत नाही. कारण फक्त तालुक्यातच नाही तर राज्यातील तरुणाईत शेळकेंची क्रेझ असून अनेक आमदारांसोबतही त्यांचे चांगले संबंध आहे.

अधिक वाचा –
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण
– मुळशीतील पौड इथे खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
– उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार


dainik maval jahirat

Previous Post

धक्कादायक! लोणावळ्यात चिक्कीच्या दुकानात शिरला ट्रक

Next Post

भाविकांसाठी आनंदाची बातमी! कार्ला येथील आई एकविरा देवीचे दर्शन 24 तास सुरु राहणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ekvira-Devi

भाविकांसाठी आनंदाची बातमी! कार्ला येथील आई एकविरा देवीचे दर्शन 24 तास सुरु राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.