व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ऊस गाळप हंगामासाठी गठीत मंत्री समितीची बैठक मंत्रालयात पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 21, 2023
in महाराष्ट्र
Sugarcane

Photo Courtesy : Team Dainik Maval


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ऊस गाळप हंगामासाठी गठीत मंत्री समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आदी सदस्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. या बैठकीत राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

यंदा 14.07 लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून 88.58 लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी कमी झाले आहे. निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर कारखान्यांचे गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ( Sugarcane crushing season will start from 1 November Said CM Eknath Shinde )

गेल्या वर्षी राज्यात 211 साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून 105 लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा मात्र उसाचे क्षेत्र घटल्याने साखर उत्पादन 88.58 लाख मेट्रीक टन एवढे होण्याचा अंदाज यावेळी वर्तविण्यात आला. हंगाम 2022-23 मध्ये साकार उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून त्यापाठोपाठ उत्तरप्रदेश राज्याचा क्रमांक आहे.

ऊस तोड कामगारांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून 10 रुपये प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम देण्याचे यावेळी निर्णय झाला. या रकमेतून कामगारांच्या मुला-मुलींसाठी शाळा, वसतीगृह त्याचबरोबर कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी एफआरपी बाबात समग्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

अधिक वाचा –
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास
– पुण्यातील 30 ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे’ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मावळमधील दोन केंद्रांचा समावेश
– आमदार सुनिल शेळकेंची क्रेझच निराळी! गिर्यारोहकांनी वजीर सुळक्यावर फडकवला वाढदिवसाचा बॅनर । MLA Sunil Shelke Birthday

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

यंदा गुलाल उधळायचाच..! ग्रामपंचायत निवडणूक : मावळ तालुक्यात सरपंच पदाच्या 21 जागांसाठी तब्बल 117 अर्ज, वाचा गावनिहाय आकडेवारी

Next Post

मुळशीतील पौड इथे खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shivsena-mulshi-taluka

मुळशीतील पौड इथे खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.