Dainik Maval News : मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांना वाचविण्यात शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांना यश आले आहे. 2 ऑक्टोबर रात्री उशिरा केलेल्या बचावकार्यानंतर शिवदुर्ग बचाव पथकाने या तीन पर्यटकांची सुरक्षितपणे सुटका केली.
मध्य प्रदेशातून तीन पर्यटक हे पर्यटनासाठी तिकोना किल्ल्यावर आले होते. यावेळी रात्रीच्या अंधारात वाट चुकून हे तीन पर्यटक निर्जन ठिकाणी अडकले. शिवदुर्ग बचाव पथकाला पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच त्यांनी शोधमोहीम सुरु केली.
शोधमोहिमेदरम्यान तिघांपैकी दोन जण बचाव पथकाला सापडले. मात्र त्यापैकी एक जण किल्ल्यात आणखी आत गेल्याने त्याला शोधणे थोडे अवघड झाले होते. त्याचा आवाज ऐकू आल्यावर तो अजूनही किल्ल्यातच असल्याचे बचाव पथकाच्या ध्यानात आले. त्याचा शोध घेण्यासाठी बचाव पथक त्याच्या आवाजाच्या दिशेने सरसावले.
यावेळी घाबरलेल्या पर्यटकाने बचाव पथकाच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. अशा आव्हानात्मक परिस्थितीत संयम राखत शिवदुर्ग बचाव पथकाने शोधकार्य चालू ठेवले. अखेर अडकलेल्या त्या तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात पथक यशस्वी ठरले.
अडकलेल्या तीन पर्यटकांची ओळख पटली असून त्यांची नावे जितेंद्र काजडे, जितेन मार्खा आणि बाबू मर्देसाई अशी त्यांची नावे असून त्यांच्यासोबत वीरेंद्र मार्गाव, मुकेश आणि राकेश जांभेकर होते. या तीन पर्यटकांच्या बचावकार्यात शिवदुर्ग पथकातील सुजित मोहोळ, रमेश कुंभार आणि गणेश सानस यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ
– मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला
– शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक
