व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

गेली अनेक वर्षांपासून मालकी हक्काच्या नोंदीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा!

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 4, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कैकाडी समाजातील १७ कुटुंबांच्या घरांची नगर परिषद मालमत्ता म्हणून झालेली नोंद हटवून संबंधित कुटुंबांच्या नावाने स्वतंत्र नगर भूमापन क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच धारणाधिकार अ देण्यात आला. त्यानंतर संबंधित कुटुंबांच्या नावाच्या मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.

तळेगाव दाभाडे येथील शनिवार पेठ गावठाणातील सर्व्हे क्रमांक २८८ पैकी जागेवर कैकाडी समाजातील संबंधित कुटुंबांची घरे अनेक दशकांपासून आहेत. सुमारे ७० ते ८० वर्षांपूर्वी झालेल्या नोंद प्रक्रियेत या घरांच्या मालकीची नोंद नगर परिषदेची मालमत्ता म्हणून झाली होती. संबंधित कुटुंबांकडून नियमित घरपट्टी भरली जात असतानाही त्यांच्या नावाने स्वतंत्र मालकी हक्काची नोंद झालेली नव्हती.

त्या काळात या परिसराचा सिटी सर्व्हे झालेला नसल्याने हा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. आता या प्रक्रियेमुळे १७ कुटुंबांना त्यांच्या घरांच्या मालकीबाबत अधिकृत दस्तऐवज प्राप्त झाला आहे. मिळकत पत्रिका मिळाल्याने अनेक वर्षांपासून मालकी हक्काच्या नोंदीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळाला.

कैकाडी समाजातील कुटुंबांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी महसूल विभागाकडे पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले. पीआर कार्ड वाटपप्रसंगी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्यासह कैकाडी समाजातील नागरिक, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ
– मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला
– शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील निगडे येथील जिल्हा परिषद शाळेत “डिव्हाईस फॉर ड्रीम्स” उपक्रमातून डिजिटल शिक्षणाला चालना !

Next Post

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची 'शिवदुर्ग मित्र'कडून थरारक सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
Digital education gets boost through Device for Dreams initiative at Zilla Parishad School in Nigade Maval

मावळमधील निगडे येथील जिल्हा परिषद शाळेत “डिव्हाईस फॉर ड्रीम्स” उपक्रमातून डिजिटल शिक्षणाला चालना !

October 3, 2026
BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.