Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेच्या “डिव्हाईस फॉर ड्रीम्स” या उपक्रमात सहभागी होत Lady BamFord संस्थेने मावळ तालुक्यातील निगडे येथील प्राथमिक शाळेस १२ लॅपटॉप देणगी स्वरूपात दिले आहे. या सुविधेमुळे निगडे येथील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे द्वार खुले झाले आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी आज (दि. ३ ऑक्टोबर) निगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन पाहणी केली.
गजानन पाटील यांनी शाळेतील या डिजिटल क्लासरूमची पाहणी करून उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधला. या सुविधेबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ
– मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला
– शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

