प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील 30 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांसह राज्यातील 511 केंद्रांचे शुक्रवार (दि. 19 ऑक्टोबर) दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराच्यादृष्टीने उपयुक्त कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत पुरंदर तालुक्यातील दिवे ग्रामपंचायत परिसरात शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विक्रांत राजपूत, गट विकास अधिकारी अमिता पवार, नागरिक, दिवे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.
- पुणे जिल्ह्यात इतर ठिकाणीही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव, स्थानिक लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र उदघाटन कार्यक्रमाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार तयार होण्याच्यादृष्टीने युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत आहेत. ( PM Narendra Modi inaugurated 30 Pramod Mahajan Rural Skill Development Centers in Pune district )
पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे सहायक सौंदर्य थेरपिस्ट, घोडेगाव येथे शिलाई मशीन ऑपरेटर, शिनोली येथे प्रक्रिया पर्यवेक्षक (रंगकाम व मुद्रणकला), बारामती तालुक्यात बाबुर्डी येथे मल्टिस्किल इलेक्ट्रिकल तंत्रज्ञ आणि गुणवडी येथे वेब डेव्हलपर, भोर तालुक्यात भोलावडे येथे सुरक्षा रक्षक व वेलु येथे गृहस्वच्छता-स्वयंपाकी या विषयांचे कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दौंड तालुक्यात यवत येथे पथ खाद्य विक्रेता, पाटस येथे सहायक वीजतंत्री आणि केडगाव येथे गृहस्वच्छता-स्वयंपाकी, हवेली तालुक्यात उरळीकांचन येथे मल्टिस्किल इलेक्ट्रिकल तंत्रज्ञ, लोणीकाळभोर येथे गृहस्वच्छता-स्वयंपाकी आणि कदमवाकवस्ती येथे वीजतंत्री- घरगुती साधने, इंदापूर तालुक्यात कळंब वालचंदनगर येथे मल्टिस्किल इलेक्ट्रिकल तंत्रज्ञ आणि निमगाव केतकी येथे सुरक्षा रक्षकविषयक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जुन्नर तालुक्यात नारायणगाव येथे वैद्यकीय अभिलेख सहायक, ओतुर येथे मोबाईल हार्डवेअर दुरुस्ती तंत्रज्ञ आणि आळेफाटा येथे अकाउंट्स एक्झिक्युटीव्ह, खेड तालुक्यात नानेकरवाडी येथे सीएनसी ऑपरेटर- टर्निंग आणि मेदनकरवाडी येथे फिटर- फॅब्रिकेशन, मावळ तालुक्यात कुसगाव बु. येथे ग्राफिक डिझायनर आणि खडकळा येथे ॲनिमेटर, मुळशी तालुक्यात पिरंगुट येथे मल्टिस्किल टेक्निशयन आणि माण येथे फील्ड टेक्निशियन- संगणक व साधने या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अधिक वाचा –
– ‘राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी’, उद्योगमंत्र्यांनी जनरल मोटर्सच्या कामगारांना नेमके काय आश्वासन दिले? वाचा सविस्तर
– आमदार सुनिल शेळकेंचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा होणार; ‘नागरिकांनी भेटीसाठी येऊ नये’, आमदारांचे आवाहन
– महिला आर्थिक सक्षमीकरण आणि ग्राम उद्धार कार्यक्रमांतर्गत शिळींब गावातील महिलांना शेवई बनवण्याचे यंत्र वाटप